निवडणुकीसाठी मनसेचा ‘डिजिटल राजमार्ग’, राज ठाकरेंच्या विचारांना follow करण्याचं आवाहन
गेल्या काही वर्षात राजकीय पक्ष डिजिटल माध्यमाचा पुरेपूर वापर करताना पहायला मिळता असून, निवडणुकीच्या काळात तर या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर तर सर्वाधिक होत असतो. आता तर मनसेने त्यांच्या पक्षाचे अधिकृत पेजही अपडेट केले आहे. आगामी काळात मुंबई महानगर पालिकेसोबतच इतर पालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत.
मुंबई : गेल्या काही वर्षात राजकीय पक्ष डिजिटल माध्यमाचा पुरेपूर वापर करताना पहायला मिळता असून, निवडणुकीच्या काळात तर या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर तर सर्वाधिक होत असतो. आता तर मनसेने त्यांच्या पक्षाचे अधिकृत पेजही अपडेट केले आहे. आगामी काळात मुंबई महानगर पालिकेसोबतच इतर पालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत.
आधीच हिंदुत्वाची कास पकडलेल्या मनसेने निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट केली असतानाच आता मनसे डिजिटल राजमार्ग याचा सोशल मीडियावर पुरेपूर वापर करणार असल्याचे सध्या तरी मनसेने आपल्या अधिकृत पेजवर टाकलेल्या पोस्टवरुन दिसून येत आहे.
काय आहे मनसेचा डिजिटल राजमार्ग?
प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नवनिर्माणाच्या विचारांना follow करत, राज्यभरातील महाराष्ट्र सैनिकांच्या कार्याला like करत, महाराष्ट्र धर्म share करत, अन्यायाविरोधात comment करत मनसेचे वादळ उठवू या! निवडणुकीतील विजयाकडे नेणारा डिजिटल राजमार्ग बांधूया! असे म्हणत मनसेने एक पोस्ट शेअर केली आहे.
तसेच मनसे नेते किर्तीकुमार शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत प्रसार माध्यम MNS Adhikrut हे आता कात टाकत असल्याचे म्हटले आहे. तसेच फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांच्यासह विविध समाज माध्यमांवर उपस्थित लक्षावधी महाराष्ट्र सैनिकांना आणि जगभरातील मराठीजणांना जोडून घेत नव्या रंगात, नव्या ढंगात येत आहे. आपल्याला राज ठाकरे यांनी मांडलेला नवनिर्माणाचा विचार अधिक प्रभावीपणे सर्वदूर पोहोचवायचा आहे. त्यासाठी तुमचाही सहभाग हवाच असे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मनसे अधिकृतवर काय पहायला मिळणार?
राजसाहेब ठाकरे यांच्या रोखठोक भूमिका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांच्या व्हिडिओ मुलाखती
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांचा परिचय
विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासकांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ आणि ताज्या घडामोडीवरील विशेष लेख
भांडुपमध्ये मनसेचा मेळावा होणार
मागील निवडणुकीत मनसेला राज्यात चांगलं यश प्राप्त करता आलेलं नाही. मात्र, आगामी निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. विशेष म्हणजे नाशिक, पुणे, ठाणे मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद या ठिकाणी मनसेकडून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. राज ठाकरे स्वत: या महापालिकांकडे बारकाईने लक्ष देत आहेत. गेल्या महिनाभरात नाशिक, पुण्यातील संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांनी आता मुंबईकडे मोर्चा वळवला आहे. 23 ऑक्टोबरला मुंबईतील भांडुपमध्ये मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पक्षप्रमुख राज ठाकरे संबोधित करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षबांधणी, राजकीय रणनीती याबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करतील, अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिलीय.
पुणे, नाशिकनंतर आता राज ठाकरेंनी मुंबईकडे मोर्चा वळवला, भांडुपमध्ये मनसेचा मेळावा होणार https://t.co/TQ1WetdJfZ @RajThackeray @mnsadhikrut @ShivSena @OfficeofUT @BJP4Maharashtra #RajThackeray #MumbaiMunicipalElection #Bhandup #MNS #Shivsena #BJP #UddhavThackeray #amitthackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2021
संबंधित बातम्या :
दसरा मेळाव्याचं बाळासाहेब ठाकरेंचं भाषण म्हणजे पर्वणी, आता सगळंच अळणी : संदीप देशपांडे
गर्व से कहो हम हिंदू हैं, मनसेने डिवचलं, सेना भवनासमोर पोस्टरबाजी