बाप सरपंच असला तरी पोर बोलतं हवा फक्त आपलीच! अमित ठाकरेंचा साधेपणा दाखवणारा फोटो व्हायरल

Amit Thackeray | या फोटोत राज ठाकरे यांच्याभोवती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा गराडा पडलेला दिसत आहे. मात्र, त्यावेळी आपण राज ठाकरे यांचे पूत्र असल्याचा कोणताही बडेजाव न मिरवता गाडीपाशी शांतपणे उभे आहेत.

बाप सरपंच असला तरी पोर बोलतं हवा फक्त आपलीच! अमित ठाकरेंचा साधेपणा दाखवणारा फोटो व्हायरल
राज ठाकरे आणि अमित ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 9:47 AM

मुंबई: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या मनसेप्रमुख राज ठाकरे राज्यभरात दौरे करत फिरत आहेत. मात्र, यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमित ठाकरे हादेखील मैदानात उतरला आहे. अमित ठाकरे यांच्याकडे नाशिक महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासाठी अमित यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिकचा दौरा केला होता. त्यामुळे आगामी काळात ते मनसेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असतील, असे संकेत मिळत आहेत.

मात्र, या सगळ्यानंतरही अमित ठाकरे हे अद्याप किती साधेपणाने वागतात, हे दाखवणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. amitthackeray.speaks या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या फोटोची सध्या प्रचंड चर्चा आहे. या फोटोत राज ठाकरे यांच्याभोवती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा गराडा पडलेला दिसत आहे. मात्र, त्यावेळी अमित ठाकरे आपण राज ठाकरे यांचे पूत्र असल्याचा कोणताही बडेजाव न मिरवता गाडीपाशी शांतपणे उभे आहेत.

अमित ठाकरे नव्या भूमिकेत

अमित ठाकरे हे अलीकडेच राजकारणात सक्रिय झाले आहेत. यापूर्वी ते मनसेचे पदाधिकारी असले तरी निवडक कार्यक्रम वगळता ते मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये फारसे मिसळत नव्हते. परंतु, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्यादृष्टीने अमित ठाकरे यांचा एक नवा चेहरा पाहायला मिळत आहे. अमित ठाकरे हे प्रसारमाध्यमांशी पूर्वीपेक्षा अधिक संवाद साधायला लागले आहेत. पक्षाची राजकीय रणनीती ठरवण्याच्या बैठकांमध्ये सहभागी होऊ लागले आहेत. त्यामुळे अमित ठाकरे यांच्याभोवती आणखी वलय निर्माण होऊ लागले आहे.

अमित ठाकरेंचा फोटो का व्हायरल होतोय?

या फोटोतील अमित ठाकरे यांचा साधेपणा अनेकांना भावला आहे. एरवी अगदी लहानसहान नेता किंवा अगदी गावचा सरपंच म्हटला तरी त्याच्या कुटुंबीयांचा प्रचंड रुबाब असतो. मात्र, अमित ठाकरे यांच्यात असलेला साधेपणा या फोटोत स्पष्टपणे दिसत आहे.

amitthackeray.speaks हे इन्स्टाग्राम अकाऊंट चालवणाऱ्याने अमित ठाकरे यांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. बाप सरपंच असला तरी पोर बोलतं हवा फक्त आपलीच! इथे तर ह्या पोराच्या समोर जे नाव आहे ना त्या नावाने चांगले चांगले घायाळ होतात,तरी नम्रता बघा किती आहे फक्त नेता असून चालत नाही.उद्याचा नेता हा सामान्य जनतेतून घडत असतो,कोणताही गर्व न बाळगता हा एक दिवस महाराष्ट्राच भविष्य नक्की बदलेल, असे या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या:

Special Report | नाशिकसाठी अमित ठाकरेंना मोठी जबाबदारी?

PHOTO : अमित ठाकरे राजकारणाच्या मैदानातून थेट फुटबॉलच्या मैदानात, भर चिखलात लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद

अमित ठाकरे नाशिकमध्ये दाखल; पदाधिकाऱ्यांशी वन-टू-वन चर्चा करणार

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.