MNS vs NCP : ‘मनसे’ घराघरापर्यंत पोहोचेल इतका मोठा पक्ष नाही, जयंत पाटलांनी मनसेला डिवचलं

मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला.

MNS vs NCP : 'मनसे' घराघरापर्यंत पोहोचेल इतका मोठा पक्ष नाही, जयंत पाटलांनी मनसेला डिवचलं
जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेतेImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 3:40 PM

मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) राष्ट्रवादीवर (NCP) आणि पर्यायाणे शरद पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. राष्ट्रवादी आणि मनसे (MNS) नेत्यांमध्ये या न त्या कारणावरुन वार पलटवार, टीका टिप्पणी सुरू असतात. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा घराघरापर्यंत पोहोचेल इतका काही मोठा पक्ष नाही, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं. मनसैनिकांनी हे पत्रक घराघरापर्यंत पोहोचवावं, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. यावरुनच जयंत पाटलांनी  यांनी मनसेला डिवचलंय.

जयंत पाटील यांनी मनसेची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली आहे. राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष घराघरापर्यंत पोहोचेल इतका काही मोठा नाही. त्यांनी जे पत्रक काढलं आहे, ते कुठपर्यंत पोहोचतंय त्याला कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो, हे पाहून बोलेन, असं पाटील यांनी म्हटलंय. यामुळे प्रचंड राजकारण तापलंय.

हे सुद्धा वाचा

जयंत पालटलांवर मनसेचा पलटवार

मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर पलटवार केलाय. ते म्हणाले की, ‘आमच्यावर बोलण्यापेक्षा स्वतःचा पक्ष 2 जिल्हाभर कसा वाढेल. हे पहा. जयंत पाटलांच्या राष्ट्रात हा पक्ष फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आहे. विधानपरिषदेच्या बाहेर जयंत पाटलांनी 5 हजार लोक जमा करून दाखवावीत. चार खासदार आणि आपण पंतप्रधान बनण्याची स्वप्न बघता ? पाटील साहेब खूप जास्त बोलत आहेत,’ असं काळे यावेळी म्हणालेत.

आजाराची चेष्टा करणं योग्य नाही

मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पहिल्या दिवसांपासून मास्क घातलं होतं. तरीही दोनदा कोरोना झाला आहे. सुप्रियाताई नेहमी मास्क घालत होत्या. सुप्रियाताई यांनासुद्धा कोरोना झाला होता. एखाद्या आजाराची चेष्टा करणाऱ्या उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजितदादांना शोभत नाही. मुद्दे कुठे भेटले नाही तर राष्ट्रवादी आणि अजित पवारांचा असा स्वभाव आहे? तो त्यांनी बदलावा एवढीच विनंती करतो.’

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.