AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संभाजीनगर येथील सभेपूर्वी मनसेकडून उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न, प्रत्युत्तर दिलं जाणार?

महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर येथील सभेपूर्वी मनसेकडून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्वविटरवर उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

संभाजीनगर येथील सभेपूर्वी मनसेकडून उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न, प्रत्युत्तर दिलं जाणार?
Image Credit source: TV9 NETWORK
| Updated on: Apr 02, 2023 | 6:53 PM
Share

मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी औरंगाबादमध्ये सभा घेतली होती. त्यावेळी औरंगाबादच्या नामांतरावरुन त्यांनी महत्त्वाचं विधान केलेलं. त्याच विधानावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केलेली. याबाबतचे दोन्ही व्हिडीओ शेअर करत खोपकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानावेत, असं मनसे नेते अमेय खोपकर म्हणाले आहेत. औरंगाबादच्या नामांतरावरुन अमेय खोपकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर सभा ओरंगाबादलाच झाली असती, असा टोला त्यांनी लगावला.

अमेय खोपकर नेमकं काय म्हणाले?

छत्रपती संभाजीनगर या नावासाठी साठी सदैव आग्रही असणारे राज ठाकरे आणि नामांतर घडवून आणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांनी आज आभार मानायला हवे. कारण आज जर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असते तर महाविकास आघाडीची आजची सभा ‘औरंगाबाद’मध्येच झाली असती.

उद्धव ठाकरे यांच्या व्हिडीओत काय?

“होय, मी संभाजीनगर म्हणतोय. अहो, नामांतर करण्याची गरज काय?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

राज ठाकरे व्हिडीओत काय म्हणाले?

“परवा दिवशी म्हणाले, औरंगाबादचं नामांतर झालं काय आणि नाही झालं काय, मी बोलतोय ना, अरे तू कोण आहे? तू कोण वल्लभाई पटेल, महात्मा गांधी, कोण आहे?”, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.