Amit Thackeray : पक्षाला उभारी देण्यासाठी अमित ठाकरे मैदानात, ‘राज’पुत्राचा लोकल प्रवास…

MNS : अमित ठाकरे अंबरनाथ दौऱ्यावर

Amit Thackeray : पक्षाला उभारी देण्यासाठी अमित ठाकरे मैदानात, 'राज'पुत्राचा लोकल प्रवास...
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 11:57 AM

अंबरनाथ : राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सध्या सर्वत्र दौरा करत आहेत. पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी नुकतंच मिरा भाईंदर वसई विरार आणि पालघर बोईसर दौरा केला. त्यानंतर ते आज विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी, त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज या दौऱ्यासाठी दादर ते अंबरनाथ लोकलने प्रवास केला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांच्या आगमनासाठी जंगी तयारी केली आहे. प्राचीन शिव मंदिरात जाऊन दुग्धअभिषेक करून त्यानंतर अमित ठाकरे (Amit Thackeray) आपल्या संवाद दौराला सुरुवात करतील. त्यांच्या उपस्थितीत अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी मनसेत प्रवेश करणार आहेत.

अमित ठाकरे अंबरनाथ दौऱ्यावर

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सध्या सर्वत्र दौरा करत आहेत. पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी नुकतंच मिरा भाईंदर वसई विरार आणि पालघर बोईसर दौरा केला. त्यानंतर ते आज विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी, त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर दौऱ्यावर आहेत.

लोकलमधून प्रवास, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

अमित ठाकरे अंबरनाथमध्ये आहेत. तिथे जाण्यासाठी त्यांनी त्यांच्या घरापासून म्हणजेच दादरपासून अंबरनाथपर्यंत लोकलने प्रवास केला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांच्या आगमनासाठी जंगी तयारी केली आहे.

हे सुद्धा वाचा

तरूणांचा मनसेत प्रवेश

तरूणांनी मनसेत यावं, जनहिताचं काम करावं, अशी मनिषा अमित ठाकरे यांनी बोलून दाखवली. त्यासाठी ते तरूणाईशी संवाद साधत आहेत. विद्यार्थी आणि तरुणांसोबत अमित ठाकरे यांचा आज अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर येथे संवाद दौरा होतोय. यात काही विद्यार्थी आणि तरूण अमित ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश करणार आहेत.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.