मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यात कार्यकर्त्याच्या घरी घेतला जेवणाचा आस्वाद

पुणे दौऱ्यात राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांसोबत वैयक्तिक पातळीवर संवाद साधून त्यांची मतं जाणून घेत आहेत. तसंच येणाऱ्या निवडणुकीबाबत रणनिती ठरवली जाणार असल्याचं मनसे नेत्यांकडून सांगितलं जात आहे. अशावेळी राज ठाकरे यांनी आज दुपारी एका कार्यकर्त्याच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यात कार्यकर्त्याच्या घरी घेतला जेवणाचा आस्वाद
राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांसोबत जेवण
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 5:07 PM

पुणे : पुण्यात सध्या महापालिका निवडणुकीचे (Pune Municipal Elections) वार वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पक्षसंघटनेवर बळ देताना दिसत आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांसोबत वैयक्तिक पातळीवर संवाद साधून त्यांची मतं जाणून घेत आहेत. तसंच येणाऱ्या निवडणुकीबाबत रणनिती ठरवली जाणार असल्याचं मनसे नेत्यांकडून सांगितलं जात आहे. अशावेळी राज ठाकरे यांनी आज दुपारी एका कार्यकर्त्याच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला.

राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. या दरम्यान राज ठाकरे यांनी पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. कमरेवर झालेल्या शस्त्रक्रीयेमुळे राज ठाकरे यांना पदाधिकाऱ्यांसोबत पंगतीत न बसता खुर्चीवर बसून जेवण करावं लागलं. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते अनिल शिदोरे, बाबू वागसकर, सरचिटणीस किशोर शिंदे, मनसे राज्य सचिव सचिन मोरे, उपाध्यक्ष बाळा शेडगे, नगरसेवक वसंत मोरे, श्रीनिवास घाटगे हे देखील उपस्थित होते.

Raj Thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पक्ष कार्यकर्त्यांसोबत जेवण

पुण्यात पदाधिकाऱ्यांसोबत बैठका आणि चर्चा

दरम्यान, बुधवारी नियोजित बैठका झाल्यानंतर राज ठाकरे यांचा आज 9 ते 11 वाजता कसबा मतदारसंघ, 12 ते 2 पर्वती मतदारसंघ, दुपारी 4 ते 5:30 वाजता कॅन्टोन्मेंट मतदार संघ आणि संध्याकाळी 6 ते 7:30 वाजता वडगावशेरी मतदार संघाची बैठक, असा कार्यक्रम आहे. शुक्रवारी 17 डिसेंबरला आजी माजी नगरसेवक यांची बैठक होणार आहे, अशी माहिती यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली.

पंतप्रधान मोदींचं बांधकाम कामगारांसोबत जेवण

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण केलं. त्यावेळी त्यांनी तिथल्या बांधकाम कामगारांना कधीही न विसरता येणारी अशी भेट दिली. कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या बांधकामातील मजुरांसोबत भोजन केलं. याआधी प्रयागराजच्या कुंभमेळ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी साफसफाई कामगारांचे पाय धुवून सन्मान केला होता.

इतर बातम्या :

OBC Reservation : ओबीसींच्या जागा खुल्या प्रवर्गात टाकून जानेवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका?

Ajit Pawar | हा अधिकार त्यांचाच आहे म्हणत अजित पवारांनी राज्यपालांना लोकशाहीचा धडा सांगितला, नेमकं काय म्हणाले?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.