‘CM उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगणाऱ्यास आम्ही 1001 रुपयाचं बक्षिस देऊ’

रविवारी उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. पण यातलं काहीच कळलं नसल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.

'CM उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगणाऱ्यास आम्ही 1001 रुपयाचं बक्षिस देऊ'
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 9:56 AM

मुंबई : ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगणाऱ्यास आम्ही 1001 रुपयाचं बक्षिस देऊ’, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. रविवारी उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून ते रेल्वे सुरू करण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. पण यातलं काहीच कळलं नसल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. (mns sandip deshpande criticized on CM Uddhav Thackeray speech)

खरंतर, लोकल सुरू करण्याच्या मुद्दा मनसेनं उचलून धरला आहे. यासाठी वारंवार ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. यातच रविवारच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणालाही मनसेकडून लक्ष्य करण्यात आलं आहे. ‘राज्याच्या डॉक्टर आणि कंपाऊंडरने पेशंटची वाट लावली आहे. एकीकडे आदित्य ठाकरे म्हणतात 21 ऑक्टोबरला रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न करू तर दुसरीकडे राजेश टोपे म्हणतात नोव्हेंबर अखेरीस सर्व सुरू होईल. म्हणजेच या सरकारमध्ये समन्वय नाही’ अशी टीका यावेळी संदीप देशपांडे यांनी केली आहे.

रोहित पवारांसाठी मातोंश्रींनी कसली कंबर, PHOTO पाहून तुम्हीच म्हणाल ‘एक नंबर’

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना गर्दी नको असेल तर त्यांनी घरातच थांबावं. मात्र, सर्वसामान्य जनतेला कामावर जायचं आहे. बँकेचे हफ्ते भरायचे आहेत. याकडे लक्ष कोण देणार? असा थेट सवाल यावेळी संदीप देशपांडे यांच्याकडून करण्यात आला आहे. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. (mns sandip deshpande criticized on CM Uddhav Thackeray speech)

दरम्यान, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर याआधीही संदीप देशपांडे यांनी घणाघाती टीका केली आहे. ‘तुम्ही रेस्टॉरंट-बार सुरू करत आहात. एक-एक आस्थापना सुरू करताय, पण त्यासाठी लोकांनी कामावर कसं जायचं? त्या प्रश्नाचं उत्तर सरकार देत नाही’ असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं.

इतर बातम्या –

भारतीय रेल्वेत 1 लाख 40 हजारांहून अधिक रिक्त पदांची भरती, परीक्षेची तारीख जाहीर

डिस्काऊंटसोबत खरेदी करा स्वस्त सोनं, आजपासून सुरू होतेय सरकारी योजना

(mns sandip deshpande criticized on CM Uddhav Thackeray speech)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.