मनसेचा निर्धार, 24 तारखेला ऊर्जामंत्र्यांचा 21 फुटांचा पुतळा जाळणार

वीजबिल माफीचा सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला असून या आंदोलनाची पहिली ठिणगी विदर्भातून पडणार आहे. (MNS warns to protest from tuesday over inflated power bills)

मनसेचा निर्धार, 24 तारखेला ऊर्जामंत्र्यांचा 21 फुटांचा पुतळा जाळणार
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 10:49 AM

नागपूर: वीजबिल माफीचा सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला असून या आंदोलनाची पहिली ठिणगी विदर्भातून पडणार आहे. 24 नोव्हेंबर रोजी मंगळवारी विदर्भात वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा 21 फुटांचा पुतळा जाळण्यात येणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. (MNS warns to protest from tuesday over inflated power bills)

वीजबिल माफीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याचा निर्णय झाल्यानंतर विदर्भातील मनसे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. विदर्भातील हिंगणघाट शहरात मनसेकडून मंगळवारी मोठं आंदोलन करण्यात येणार आहे. मनसे नेते अतुल वादिले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून यावेळी ऊर्जामंत्र्याचा 21 फुटांचा पुतळा जाळून रोष व्यक्त करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारचा निषेधही नोंदवण्यात येणार आहे.

दरम्यान, काल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात सोमवारनंतर वीजबिल माफीसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगितलं. सोमवारनंतर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचे मोर्चे निघतील. सरकारला वाढीव वीजबिल माफ करण्यास आम्ही भाग पाडू. तेव्हाही सरकारने ऐकलं नाही तर पुढे उग्र आंदोलनं करावी लागतील. आमची पुढची आंदोलनं कशी असतील त्याचं स्वरुप आता सांगता येणार नाही. सरकार आणि जनतेलाही आमची आंदोलनं कशी असतात हे माहीत आहे, असा इशारा त्यांनी दिला होता.

लॉकडाऊनच्या काळात एप्रिल ते जून दरम्यान जे वाढीव बिल देण्यात आलं त्याचा सरकारनं गांभीर्यानं विचार करायला हवा होता. दिवाळीपर्यंत आम्ही गोड बातमी देऊ असं सरकारनं स्पष्ट केलं होतं. अजूनही ही बातमी आली नाही. एकीकडे सरकार निर्णय घेऊ म्हणून सांगत आहे आणि दुसरीकडे राज्याचे मंत्री वाढीव बिल माफ केलं जाणार नसल्याचं सांगतात. तुमच्यातच एकोपा नसेल तर लोकांनी त्याचा भुर्दंड का सोसायचा? असा सवाल करतानाच म्हणूनच आम्ही जनतेला वीजबिल न भरण्याचं आवाहन करत आहोत, असं नांदगावकर म्हणाले. जोपर्यंत राज्य सरकार निर्णय घेत नाही. तोपर्यंत बील भरूच नका. या सरकारला निर्णय घ्यायला आपण भाग पाडलंच पाहिजे, असंही ते म्हणाले होते.

संबंधित बातम्या:

शरद पवारांच्या शब्दालाही सरकारमध्ये किंमत उरली नाही : बाळा नांदगावकर

सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम, वीजबिल कमी करा अन्यथा उग्र आंदोलन, मनसेचा एल्गार

भाजपमध्ये मराठी माणसं नाहीत का?; प्रवीण दरेकरांचा राऊतांना सवाल

(MNS warns to protest from tuesday over inflated power bills)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.