केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात ११ मंत्र्यांना वगळणार, कोणाला मिळणार संधी?

लोकसभेची २०२४ ची निवडणूक लक्षात घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. या विस्तारात ११ मंत्र्यांना वगळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिला. त्यातील काही जणांना संघटनेची जबाबदारी दिली जाणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात ११ मंत्र्यांना वगळणार, कोणाला मिळणार संधी?
PM Narendra ModiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 11:22 AM

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची (bjp meeting )बैठक १६ व १७ जानेवारी रोजी नवी दिल्लीत झाली. आता या बैठकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची (Modi Cabinet Expansion)प्रक्रिया सुरु झाली आहे. लोकसभेची २०२४ ची (Lok Shaba election) निवडणूक लक्षात घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळाचा (cabinet minister )विस्तार केला जाणार आहे. या विस्तारात ११ मंत्र्यांना वगळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिला. त्यातील काही जणांना संघटनेची जबाबदारी दिली जाणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचा बातम्या येत आहेत. हा विस्तार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापुर्वी होणार आहे. त्यामुळे विद्यामान मंत्र्यांमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे. या विस्तारात चांगली कामगिरी नसणाऱ्या ११ मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच भारतीय जनता पक्षात संघटनात्मक फेरबदल होणार आहे. या फेरबदलात २०२४ ची लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन काही मंत्र्यांना संघटनेत पाठवले जाणार आहे. वर्षभरात १० राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुका लक्षात घेऊन विस्तारात काही जणांनी संधी मिळणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारमध्ये अंतिम फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे गटातून कोण

हे सुद्धा वाचा

मंत्रिमंडळात बदल करताना महाराष्ट्रातून शिंदे गटाला स्थान मिळणार आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला मदत करणाऱ्या शिंदे गटाच्या काही चेहऱ्यांना केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळणार याकडेही राज्यातील जनतेसह राजकीय नेत्यांचं लक्ष लागलं आहे.तसेच भाजपमधील एका बड्या नेत्याचा समावेश केला जाणार असल्याची चर्चा सुरु झालीय. राज्यातील एक किंवा दोन जणांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार असल्याची चर्चा आहे. विरोधक यासंदर्भात माध्यमांना माहिती देत आहे.

धक्कातंत्र असणार धक्कातंत्राची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला नारळ देणार व कोणाला मंत्री करणार, याची खबरबात कोणालाच नाही. परंतु २०२४च्या निवडणुका लक्षात घेऊन काही वरिष्ठ मंत्र्यांना सरकारमधून पक्षात पाठवले जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. तथापि, हे मंत्री कोण असतील, हे विस्तारा दरम्यान धक्कातंत्राच्या माध्यमातूनच समजणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.