BMC Election 2022 Malad : भाजपला वॉर्ड राखण्याचे मोठे आवाहन असणार, वॉर्ड क्रमांक 43मध्ये नेमकी राजकिय परिस्थिती काय?
2017मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर होते. यामध्येच भाजपचे उमेदवार विनोद मिश्रा यांचा प्रवेश झाला. मात्र, यंदा परिस्थिती थोडी वेगळी असणार आहे. यावेळी महाविकास आघाडीची झाल्यास मिश्रा यांचा विजय होणं कठिण असल्याचं दिसते आहे. काँग्रेसने शिवसेनेसोबत युती नाही केली.
मुंबई : 2017मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत (BMC Election 2022) सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढले होते. त्यामुळे सर्वच वार्डांमध्ये पंचरंगी निवडणुका झाल्या होत्या. शिवसेना (shivsena), भाजप, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस (congress) या सर्वांनीच निवडणुकीत उमेदवार देऊन आक्रमक प्रचारही केला होता. त्यात भाजप आणि शिवसेनेनेच सर्वाधिक जागा निवडून आणल्या. वॉर्ड क्रमांक 43 मधील निवडणूकही अत्यंत अटीतटीची होईल असं वाटत होतं. पण भाजपचे उमेदवार विनोद मिश्रा यांचा दणदणीत विजय झाला. मताधिक्य ते निवडून आले. परंतु या महापालिका निवडणुकीत परिस्थिती थोडी वेगळी आहे. यावेळी जिंकलेला वॉर्ड राखण्यासाठीच अधिक प्रयत्न करावे लागणार हे नक्की आहे.
वॉर्ड राखणे प्रस्तापित उमेदवारासाठी कठिण
2017मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर होते. यामध्येच भाजपचे उमेदवार विनोद मिश्रा यांचा प्रवेश झाला. मात्र, यंदा परिस्थिती थोडी वेगळी असणार आहे. यावेळी महाविकास आघाडीची झाल्यास मिश्रा यांचा विजय होणं कठिण असल्याचं दिसते आहे. काँग्रेसने शिवसेनेसोबत युती नाही केली. अन् फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीचीच युती झाली तरी मिश्रा यांना विजयासाठी बरीच कसरत घ्यावी लागणार हे नक्की आहे.
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | निधी प्रमोद शिंदे | 4,485 मतं |
भाजप | रुक्मिणी विठ्ठल खरटमोल | 3,256 मतं |
काँग्रेस | उषा अनिल कांबळे | 1,333 मतं |
राष्ट्रवादी | रेशा मधुकर शिससाट | 1,716 मतं |
मनसे | शोभा अशोक शानभाग | 1,009 मतं |
अपक्ष/ इतर |
आकडे नेमके काय सांगतात?
मागच्यावेळी विनोद मिश्रा यांना 5620, शिवसेनेच्या राठोड भोमसिंग हिरसिंग यांना 4911, मनसेचे सिताराम जाधव यांना 746, जाधव प्रमोद रघुनाथ अपक्ष यांना 323, काँग्रेसचे उमेदवार अजित रावराणे यांना 4782 मत मिळाली. कॉ. जमुना प्रसाद विश्वनाथ – भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) -120 जाधव प्रमोद रघुनाथ- अपक्ष- 323 सिताराम (आण्णा) जाधव- महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 746 काकडे तानाजी त्रिंबक- अपक्ष- 27 खान नाझीम युसूफ- अपक्ष- 32 विनोद उदयनारायण मिश्रा- भारतीय जनता पार्टी-5620 अजित बाळकृष्ण रावराणे- नॅशनॅलिस्ट कांग्रेस पार्टी- 4782 राठोड भीमसिंग हिरसिंग-शिवसेना- 4911 शेख आजाद अहमद हविव- अपक्ष- 39