BMC Election 2022 : ‘कमळ फुलणार की कोमेजणार हे निवडणुकीत कळेल’, महापौर पेडणेकरांचा भाजपवर पलटवार

भाजपच्या बैठकीबाबत बोलताना भाजपला हा पोटशूळ नाही तर मूळव्याध झाला आहे. आगामी पाहिला निवडणुकीत कमळ फुलणार की कोमेजणार हे कळेल. प्रत्येक पक्षाला तयारी करण्याचा अधिकार आहे. महापालिका निवडणुकीत कमळ फुलणार की धनुष्यबाण कमळाचा वेध घेणार हे निवडणुकीनंतरच कळेल, असा खोचक टोला किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार आणि भाजपला लगावलाय.

BMC Election 2022 : 'कमळ फुलणार की कोमेजणार हे निवडणुकीत कळेल', महापौर पेडणेकरांचा भाजपवर पलटवार
आशिष शेलार, किशोरी पेडणेकर
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 8:11 PM

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2022) तोंडावर मुंबईत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना आता रंगताना पाहायला मिळतोय. मुंबई महापालिका निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चारी मुंड्या चीत करत महापालिकेवर भाजपचंच कमळ फुलवण्याचा संकल्प केल्याचं सांगितलं. शेलार यांच्या या दाव्याचा महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी चांगलाच समाचार घेतलाय. कमळ फुलणार की कोमेजणार हे निवडणुकीत कळेल, असा इशाराच पेडणेकर यांनी दिलाय.

भाजपच्या बैठकीबाबत बोलताना भाजपला हा पोटशूळ नाही तर मूळव्याध झाला आहे. आगामी पाहिला निवडणुकीत कमळ फुलणार की कोमेजणार हे कळेल. प्रत्येक पक्षाला तयारी करण्याचा अधिकार आहे. महापालिका निवडणुकीत कमळ फुलणार की धनुष्यबाण कमळाचा वेध घेणार हे निवडणुकीनंतरच कळेल, असा खोचक टोला किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार आणि भाजपला लगावलाय.

भाजपचा संकल्प काय?

आमदार आशिष शेलार म्हणाले की, भाजपचे मुंबईतील प्रमुख पदाधिकारी, खासदार आमदारांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. मुंबई महापालिका निवडणुका कधीही येवोत. सत्ताधाऱ्यांना चारी मुंड्या चित करण्यासाठीच्या मुंबईतील जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा या स्वरुपाचा सर्व ठोस कार्यक्रम ठरला आहे. त्याच्या रचना लावल्या, काही गोष्टींची उजळणी केलीय, आगामी कार्यक्रमांची तयारी सुरु झाली आहे. या सगळ्या चर्चेतून पुन्हा एकदा नव्या दमाने मुंबई महापालिकेत भाजपचंच कमळ फुलणार हा संकल्प घेऊन आम्ही बैठक केली.

मैदानाला टिपु सुलतान नाव देण्यावरुन जोरदार राजकारण

दुसरीकडे मालाडमधील मैदानाला टिपु सुलतान असे नाव देण्यात येण्याची किंवा दिले गेल्याची कुठेही अधिकृत नोंद नाही. म्हाडाच्या एक्झक्युटीव्ह इंजीनिअरकडून घेतलेल्या माहितीनुसार मालाडमधील मैदानावर 2 कोटी 55 लाख खर्च करुन या दूरवस्थेतील मैदानावर सुविधा देण्यात आल्या आहेत. काँग्रेस नेते आणि मंत्री अस्लम शेख यांच्या पुढाकारातून या सुविधा देण्यात आल्या आणि मैदानाचे नुतनीकरण झाले. शासनाच्या लेखी, महापालिकेच्या लेखी मालाडमधील या मैदानाला टिपु सुलतान या नावाची अधिकृत नोंद नाही. मालाडमधील मैदानाचे नाव कुणालाही विचारताच न घेता टिपु सुलतान असे सांगण्यात आले आहे. उलट आमच्या तेथील नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे की त्या मैदानाला राणी लक्ष्मीबाईंचं नाव देण्यात आलं आहे. जर शिवसेना आंदोलन करतेय की या मैदानाला राणी लक्ष्मीबाईंचं नाव देण्यात यावं अश्यावेळी भाजपचे तेथील कार्यकर्ते कुठे होते? आज टिपु सुलतान नामकरणावरुन विरोध करणाऱ्या भाजपनं यापूर्वी भाजप नगरसेवकांच्याच वॉर्डमधील दोन रस्त्यांना टिपु सुलतान यांचे नाव दिले आहे, असा दावाही पेडणेकर यांनी केलाय.

भाजपाचे सध्याचे आमदार अमित साटम यांनी एम पूर्व वॉर्ड येथील रस्त्याला शहीद टिपु सुलतान मार्ग असे नाव देण्याबाबत 2013 मध्ये अनुमोदन दिले होते. तर 2001 मध्ये अंधेरी पश्चिम मधील भवन्स कॉलेजमधील रस्त्याला शेर-ए-टिपु सुलतान मार्ग नाव देण्याकरता त्यावेळचे भाजप नगरसेवक विठ्ठल खरटमोल हे सुचक होते, असा दावाही पेडणेकर यांनी केलाय. भाजपला विकासकामात रस नाही, केवळ शिवसेनेला बदनाम करा हीच त्याची भूमिका आहे. मात्र, दरवेळी ते तोंडावर पडतात, असा खोचक टोलाही पेडणेकर यांनी लगावला आहे.

इतर बातम्या :

‘मविआ सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?’ सोमय्यांना दिलेल्या नोटीसीवरुन फडणवीसांचा संतप्त सवाल

सोमय्यांना फाईल दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस! एखाद्या कार्यालयात जाऊन कागदपत्रे पाहता येतात का? तज्ज्ञ काय सांगतात?

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.