नाना पटोले म्हणाले, राऊतांनी कोणाचे प्रवक्ते जाहीर करावं, थोरात म्हणतात, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही

केंद्रातील मोदी सरकारविरोधात यूपीएला बळकट करायचे असेल तर त्याचं नेतृत्व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे द्या, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. (nana patole and balasaheb thorat reaction on sanjay raut statement)

नाना पटोले म्हणाले, राऊतांनी कोणाचे प्रवक्ते जाहीर करावं, थोरात म्हणतात, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही
nana patole
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 2:21 PM

मुंबई: केंद्रातील मोदी सरकारविरोधात यूपीएला बळकट करायचे असेल तर त्याचं नेतृत्व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे द्या, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. काँग्रेसने मात्र राऊत यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत कुणाचे प्रवक्ते आहेत हे त्यांनी जाहीर करावं, अशी मागणी केलीय. तर राऊतांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. (nana patole and balasaheb thorat reaction on sanjay raut statement)

राऊत काय म्हणाले होते?

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) प्रमुखपदी शिवसेनेने शरद पवार यांचे नाव सुचवल्यामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाल्याचा दावा संजय राऊत यांनी फेटाळून लावला. यूपीए आणखी मजबूत व्हायला पाहिजे, असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांनी प्रदीर्घकाळ यूपीएचे अध्यक्षपद भुषविले आहे. मात्र, सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसते. देशात वेगळ्याप्रकराच्या घडामोडी घडत आहेत. अशावेळी यूपीएचे नेतृत्त्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावे, असे देशातील अनेक पक्षांची म्हणणे आहे. अशावेळी शरद पवार यांच्याकडे किती खासदार आहेत, हा प्रश्न नाही. मी नेहमीच शरद पवार यांचे समर्थन केले आहे. जे पक्ष यूपीए किंवा एनडीएमध्ये नाहीत अशा पक्षांना एकत्र आणून यूपीएची पुनर्बांधणी झाली पाहिजे. अनेक पक्षांना शरद पवार यांचे नेतृत्त्व मान्य होऊ शकते, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

पटोले म्हणतात…

नाना पटोले यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. शिवसेना हा यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे यूपीएने कुणाला पाठिंबा द्यावा हे ते ठरवू शकत नाही. त्यांनी सल्ले देऊ नयेत असं सांगतानाच संजय राऊत कोणाचे प्रवक्ते आहेत ते आधी त्यांनी जाहीर करावं, मग आम्ही त्यावर बोलू, असं पटोले म्हणाले.

लक्ष देण्याची गरज नाही

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही राऊत यांच्या मागणीला केराची टोपली दावली आहे. यूपीए-2 नाही तर एकच राहणार आहे. सोनिया गांधीच यूपीएचं नेतृत्व करतील. राऊतांनी काँग्रेसवर बोलण्याची गरज नाही, असं थोरात म्हणाले. तसेच काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसने अनेक चढउतार पाहिले आहेत. आज कठिण दिवस असले तरी काँग्रेसला चांगले दिवस येतील. यूपीएचं नेतृत्व सोनिया गांधीच करतील. त्यामुळे राऊत म्हणतात त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले. (nana patole and balasaheb thorat reaction on sanjay raut statement)

संबंधित बातम्या:

‘राजकारणात इतका विश्वास कोणावरच टाकायचा नसतो; फडणवीसजी लूज बॉलवरच मोठी विकेट जाते’

‘ठाकरें’ना अटक ते ‘ठाकरें’च्या मंत्रिमंडळात; भुजबळांचा झंझावात माहीत आहे का?

‘त्या’ लेटरबॉम्बमुळे अजितदादांनाही राजीनामा द्यावा लागला होता; वाचा, काय होतं प्रकरण?

(nana patole and balasaheb thorat reaction on sanjay raut statement)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.