Nana Patole : संविधानावर घाला घालणाऱ्या दुरंग्यापासून सावध रहा; नाना पटोले यांचं आवाहन

Nana Patole : ज्यांना तिरंगा मान्य नव्हता तेच लोक आज ‘हर घर तिरंगा’ अभियान चालवत आहेत, हा काँग्रेस विचाराचा विजय आहे. तिरंग्याचा मान सन्मान राखला पाहिजे. परंतु या इव्हेंटबाजीत तो राखला जात नाही. चीनमधून तिरंगा झेंडे आयात करण्यात आले आहेत.

Nana Patole : संविधानावर घाला घालणाऱ्या दुरंग्यापासून सावध रहा; नाना पटोले यांचं आवाहन
संविधानावर घाला घालणाऱ्या दुरंग्यापासून सावध रहा; नाना पटोले यांचं आवाहनImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 12:08 PM

मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी भाजपवर (bjp) जोरदार हल्ला चढवला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधी, सरदार पटेल, मौलाना आझाद, पंडित जवाहरलाल नेहरु, नेताजी सुभाषचंद्र बोस या महानायकांसह लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, संघर्ष व बलिदानाने 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला व तिरंगा डौलाने फडकला. परंतु या तिरंग्याला न माननारे काही लोक आहेत. ते लोकशाही व संविधान संपवण्याचे काम करत आहेत. अशा दुरंग्यापासून सावध रहा व तिरंग्याचा मान, सन्मान कायम राखा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. टिळक भवन या काँग्रेसच्या (congress) मुख्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नाना पटोले बोलत होते. या प्रसंगी काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी जगातील इतर देशही स्वतंत्र्य झाले पण त्यांचे स्वातंत्र्य फारकाळ टिकले नाही. कारण त्या देशामध्ये लोकशाही व संविधान नव्हते. आपल्याकडे लोकशाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा काँग्रेसचा विचार होता. म्हणून आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. देशाचे विभाजन होऊ नये हा काँग्रेसचा विचार होता. पण विभाजनासाठी कोण कारणीभूत होते हे सर्वांना माहीत आहे, असं नाना पटोले म्हणाले.

हे सुद्धा वाचा

तिरंगा मान्य नसलेल्यांकडून हर घर तिरंगा अभियान

ज्यांना तिरंगा मान्य नव्हता तेच लोक आज ‘हर घर तिरंगा’ अभियान चालवत आहेत, हा काँग्रेस विचाराचा विजय आहे. तिरंग्याचा मान सन्मान राखला पाहिजे. परंतु या इव्हेंटबाजीत तो राखला जात नाही. चीनमधून तिरंगा झेंडे आयात करण्यात आले आहेत, या तिरंग्यात रंग, आकार, अशोक चक्र याचा ताळमेळ लागत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

घर देणं हा सुद्धा जुमलाच होता

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सर्वांना घर देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. आज अमृत महोत्सव साजरा करत असताना किती लोकांना घरे दिली हे पाहिले तर हा सुद्धा एक जुमलाच निघाल्याचे दिसत आहे. खोटी आश्वासने देऊन लोकांची फसवणूक करण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. स्वतंत्र भारतात शेतकऱ्याला आंदोलनजीवी, आतंकवादी म्हणून अपमानीत केले हे दुर्दैवी आहे, असंही ते म्हणाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.