… तर देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करा; नाना पटोले यांची मागणी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील कलगीतुरा थांबताना काही दिसत नाही. (nana patole criticized devendra fadnavis and sanjay raut)

... तर देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करा; नाना पटोले यांची मागणी
nana patole
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 3:51 PM

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील कलगीतुरा थांबताना काही दिसत नाही. फडणवीस हे धडधडीत खोटे बोलत असून बेछूट आरोप करत आहेत. विधानसभेत त्यांनी सीडीआरबाबत खोटी माहिती दिली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून ते महाराष्ट्राविरोधात कुभांड रचत आहेत. त्यामुळे वेळ पडली तर सरकारने फडणवीस यांचीही चौकशी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. (nana patole criticized devendra fadnavis and sanjay raut)

नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. महाराष्ट्रील सत्ता गेल्यापासून भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते सैरभैर झाले असून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम ते करत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान असून भाजपाच्या या कृतीला लोक कंटाळले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बेछूट, बेलगाम आणि बालीश आरोप करत आहेत, अशी टीका करतानाच रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करण्याचे अधिकार होते का? याची चौकशी केली जाणार आहे. काही अधिकारी केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, त्यांनी कोणाच्या हातचे बाहुले बनू नये. त्यांनी जनतेची कामे केली पाहिजेत, असं पटोले म्हणाले.

मोदींचा राजीनामा घेतला होता काय?

सरकारे येतात जातात पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातही भाजपाने केंद्रीय तपास यंत्रणांना व माध्यमांना हाताशी धरून चार महिने महाराष्ट्राला बदनाम केले. महाराष्ट्र खुनी राज्य असल्याचे चित्र निर्माण केले गेले. आताही केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून फडणवीस तेच करत आहेत. ते मुख्यमंत्री असताना न्यायाधीश असल्यासारखे सर्वांना क्लिन चिट देत सुटले होते. फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होते त्यावेळी त्यांनी राजीनामे दिले होते का? नरेंद्र मोदी यांच्यावरही आरोप आहेत, त्यांनी राजीनामा दिला का? मग अनिल देशमुख यांचा राजीनामा मागण्याचा त्यांना काय अधिकार? सध्याच्या प्रकरणात जे दोषी आढतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल, चुकीला माफी नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सरकार बॅकफूटवर नाही

परमबीर सिंग, रश्मी शुक्ला प्रकरणी सरकारच्या घटक पक्षात कोणतेही मतभेद नाहीत आणि सरकार बॅकफुटवरही नाही, असं सांगतानाच काही लोक जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी अशा अफवा पसरवत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांना भेटण्याची वेळ मागितलेली असून त्यांची वेळ मिळताच महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. (nana patole criticized devendra fadnavis and sanjay raut)

राऊत पवारांचे प्रवक्ते आहेत का?

यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनाही टोला लगावला. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल करत शिवसेना ही यूपीएची घटक पक्षही नाही. संजय राऊत यांना यूपीएच्या नेतृत्वाबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही. सोनिया गांधी या नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. यूपीएची चिंता राऊत यांनी करु नये, असा सल्लाही त्यांनी दिला. (nana patole criticized devendra fadnavis and sanjay raut)

संबंधित बातम्या:

“राठोडांच्या पाठिशी नव्हते, मात्र देशमुखांना भक्कम साथ, संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे प्रवक्ते?”

‘त्या’ लेटरबॉम्बमुळे अजितदादांनाही राजीनामा द्यावा लागला होता; वाचा, काय होतं प्रकरण?

LIVE | टाटा कॅन्सर सेंटरला 100 फ्लॅट्स, म्हाडाचा मोठा निर्णय – जितेंद्र आव्हाड

(nana patole criticized devendra fadnavis and sanjay raut)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.