अमित शाह म्हणाले, राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा; आता नाना पटोले म्हणतात, होऊ द्या ‘दूध का दूध, पानी का पानी’!

केंद्र सरकारच्या विरोधात जनतेचा राग असल्यामुळे आधी केंद्र सरकारनं राजीनामा द्यावा. केंद्रातील आणि राज्यातील दोन्ही सरकारं बरखास्त करा आणि निवडणुका घ्या. म्हणजे दूध का दूध, पानी का पानी होईल. लोकशाहीत गृहमंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. लोकशाहीचा सन्मान करायला शिका, अशा शब्दात पटोले यांनी शाहांच्या टीकेला उत्तर दिलंय.

अमित शाह म्हणाले, राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा; आता नाना पटोले म्हणतात, होऊ द्या 'दूध का दूध, पानी का पानी'!
नाना पटोले, अमित शाह
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 9:37 PM

भंडारा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पुण्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) थेट दोन हात करण्याचं आव्हान दिलं आहे. ‘मी आजही सांगतो, हिंमत असेल तर राजीनामा द्या, दोन हात करा. तिन्ही पक्ष सोबत या, भाजपचा कार्यकर्ता लढण्यासाठी तयार आहे’, असं शाह म्हणाले. शाह यांच्या या आव्हानाला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सत्तेच्या गुर्मीत असलेले लोक असं वक्तव्य करतात, अशी खोचक टीका पटोले यांनी केलीय.

केंद्र सरकारच्या विरोधात जनतेचा राग असल्यामुळे आधी केंद्र सरकारनं राजीनामा द्यावा. केंद्रातील आणि राज्यातील दोन्ही सरकारं बरखास्त करा आणि निवडणुका घ्या. म्हणजे दूध का दूध, पानी का पानी होईल. लोकशाहीत गृहमंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. लोकशाहीचा सन्मान करायला शिका, अशा शब्दात पटोले यांनी शाहांच्या टीकेला उत्तर दिलंय.

‘प्रधानमंत्र्यांनाच शोधावं लागतं, ते माध्यमांनाही भेटत नाहीत’

तसंच देशातील प्रधानमंत्र्यांनाच शोधावं लागतं. ते माध्यमांनाही भेटत नाहीत. ते फक्त टीव्हीवर भेटतात. देशाच्या अन्नदात्याला भेटायला त्यांना वेळ नाही. म्हणून कुणाला शोधावं लागेल हे तुम्हीच बघा, असा टोलाही पटोले यांनी लगावला आहे. तसंच चाकं कुणाची पंक्चर आहेत हे लोकशाहीत जनताच ठरवते, असंही ते म्हणाले. हिंदुत्व आणि हिंदू याबाबत राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य महत्वाचं आहे. कोरोना काळात नदीत प्रेत वाहून जात असताना हिंदुत्व कुठे गेलं होतं? असा सवालही पटोले यांनी केला आहे.

हिंमत असेल तर दोन हात करा, शाहांचं आव्हान

ही लोकमान्य टिळकांची भूमी आहे. ते म्हणाले होते की, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. दुसरी शिवसेना असं म्हणते की सत्ता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, कोणत्याही प्रकारे आम्ही तो घेणार. मी आजही सांगतो, हिंमत असेल तर राजीनामा द्या, दोन हात करा. तिन्ही पक्ष सोबत या, भाजपचा कार्यकर्ता लढण्यासाठी तयार आहे, असं थेट आव्हानच शाह यांनी यावेळी महाविकास आघाडीला केलं.

‘सरकारची 3 चाकी रिक्षा चालते तेव्हा प्रदूषणाशिवाय काही बाहेर पडत नाही’

महाराष्ट्रातील सरकार तीन चाकाची रिक्षा आहे. या रिक्षाचे तिन चाकं तीन दिशेला आहेत. अन आता तिन्ही चाकं पंक्चर झाली आहे. जेव्हा ही रिक्षा चालते तेव्हा प्रदूषणाशिवाय काहीही बाहेर पडत नाही, अशी टीकाही शाह यांनी यावेळी केलीय. येणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीत लक्ष्य कमी ठेवू नका. पुण्यातील जनता तुम्हाला भरभरुन द्यायला तयार आहे, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.

इतर बातम्या :

Amit Shah in Pune : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’चा अर्थ काय घेतला? अमित शाहांची जोरदार टोलेबाजी

पुण्याच्या विकासात कोणतीही कसूर ठेवणार नाही, अमित शाहांची पुणेकरांना ग्वाही

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.