Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा यांनी सरड्यासारखा रंग बदलला; नाना पटोले यांची सडकून टीका

75 वर्षे पूर्ण झाली पण कधी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले नाहीत. मणिपूर जळतंय. पण त्यावर काही केंद्र सरकार बोलत नाही. पण बंगालमध्ये जरा काही झालं की भाजपवाले बोलतात, असा हल्ला त्यांनी चढवला.

अजितदादा यांनी सरड्यासारखा रंग बदलला; नाना पटोले यांची सडकून टीका
nana patoleImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 2:47 PM

मुंबई | 26 जुलै 2023 : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. सरडा हा रंग बदलतो. काल अजित पवार यांनी सरड्या सारखा रंग बदलला. मी त्यांना सरडा म्हणत नाही पण त्यांच्यामध्ये माणसाचा धर्म दिसत नाही, अशी टीका नाना पटोले यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली.

इगतपुरीत एका गरोदर मातेचा मृत्यू झाला. या घटनेचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. अधिवेशन सुरु आहे. पुरवण्या मागण्या मान्य झाल्या आहेत. आदिवासी भागात रस्ते नाहीत. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. याबाबत आम्ही काँग्रेसने सभागृहात विषय मांडला. पुरवण्या मान्य केल्या, पण एवढा पैसा आणणार कुठून? असा सवाल आम्ही केला. ज्यांच्याकडून पैसे घेता त्यामध्ये आदिवासी देखील आहेत. पण आदिवासी लोकांना सोयी सुविधा काय देताय? भाजप केवळ मूठभर लोकांना सोयी सुविधा देताहेत. सत्तेचा माज जो भाजपला आला आहे. हा माज लोकं उतरवणार, असं नाना पटोले म्हणाले.

हे सुद्धा वाचा

टोलमुक्तीचं काय झालं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडलं. त्यावर नाना पटोले यांनी सहमती दर्शवली. बरोबर आहे. हे भाजपवाले टोलनाके मुक्त महाराष्ट्र करू असं ओरडत होते. आता काय झालं? किती टोलपासून सुटका झाली? ही टोल पार्टी आहे. समृद्धी महामार्गावर निर्दोष लोकांची हत्या करताहेत, असा आरोप त्यांनी केला.

त्यावर भाजपवाले बोलत नाहीत

सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरमधील घटनेवरून केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. 75 वर्षे पूर्ण झाली पण कधी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले नाहीत. मणिपूर जळतंय. पण त्यावर काही केंद्र सरकार बोलत नाही. पण बंगालमध्ये जरा काही झालं की भाजपवाले बोलतात, असा हल्ला त्यांनी चढवला.

जखमेवर मीठ चोळू नका

हे सरकार घोषणेचा पाऊस पाडणारं सरकार आहे. या सरकारला आमचं आव्हान आहे की घोषणा करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सरकारमुळे होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला हे भाजप सरकार जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.