हद्द झाली राव, मोदीजी आणखी किती फेकणार?; नाना पटोलेंचा बोचरा वार

हद्द झाली राव, मोदीजी आणखी किती फेकणार, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. (Nana Patole Taunts Pm Narendra Modi Over His Statement On Bangladesh Mukti Sangram)

हद्द झाली राव, मोदीजी आणखी किती फेकणार?; नाना पटोलेंचा बोचरा वार
नाना पटोले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 10:41 AM

मुंबई: हद्द झाली राव, मोदीजी आणखी किती फेकणार, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. मोदींनी आपण बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला होता, असं मोदी यांनी म्हटलं होतं. मोदींच्या या विधानाची पटोले यांनी खिल्ली उडवली आहे. (Nana Patole Taunts Pm Narendra Modi Over His Statement On Bangladesh Mukti Sangram)

नाना पटोले यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बांगलादेशातील वक्तव्याची खिल्ली उडवली. और कितना फेकोगे मोदीजी… हद्द झाली राव, असं पटोले यांनी म्हटलं आहे. शेतकरी आंदोलनावरून तुमच्या तोंडू एक शब्दही निघत नाही आणि स्वातंत्र्याच्या गप्पा मारण्यासाठी बांगलादेशमध्ये जात आहात. शेतकऱ्यांना तुम्ही आंदोलनजीवी म्हटलं होतं. आता तुम्ही कोण झालात? ढोंगीजीवी?, असा सवाल पटोले यांनी मोदींना केला आहे.

काय म्हणाले होते मोदी?

बांगलादेशाच्या 50 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात भाग घेण्यासाठी काल पंतप्रधान मोदी बांगलादेशात गेले होते. त्यावेळी त्यांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. बांगालदेशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात मी सहभागी झालो होतो. माझ्या जीवनातील हे पहिलंच आंदोलन होतं. त्यावेळी मी 20-22 वर्षाचा असेल. त्यावेळी माझ्यासह माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मीही तुरुंगात गेलो होतो, असं मोदी म्हणाले होते. मोदींच्या या विधानावरून टीका होत आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख मुजीबुर रहमान यांना मरणोपरांत घोषित झालेला गांधी शांती पुरस्कार बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे सुपुर्द केला. बांगलादेश आणि भारताचे संबंध अधिक दृढ होत आहेत. त्यामुळे मला हा पुरस्कार देताना अत्यंत आनंद होत आहे, असं ते म्हणाले. तसेच बांगलादेशच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल राष्ट्रपती अब्दुल हामिद आणि पंतप्रधान शेख हसीना यांचे आभारही मानले होते. (Nana Patole Taunts Pm Narendra Modi Over His Statement On Bangladesh Mukti Sangram)

संबंधित बातम्या:

बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्यासाठी मीही तुरुंगात गेलो होतो: PM मोदी

मोदी बांगलादेशच्या दौऱ्यातून बंगाल, आसामचे सत्ता समीकरण साधणार?; वाचा, सविस्तर

बंगाल-आसाममध्ये आज पहिल्या टप्प्यातील तोफा थंडावणार; वाचा, कुणाचं किती पारडं जड!

(Nana Patole Taunts Pm Narendra Modi Over His Statement On Bangladesh Mukti Sangram)

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.