शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार; नारायण राणेंची गर्जना

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या 11 ही आमदारांना पराभूत करण्यात येणार असून कोकणातून शिवसेना हद्दपार करण्यात येईल, अशी गर्जनाच भाजपचे नेते, खासदार नारायण राणे यांनी केली आहे.

शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार; नारायण राणेंची गर्जना
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 5:30 PM

सिंधुदुर्ग: आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अकराही आमदार निवडून येणार नाहीत. सर्वांना घरी बसवण्यात येणार असून कोकणातून शिवसेना (shivsena) हद्दपार करण्यात येईल, अशी गर्जनाच भाजपचे नेते, खासदार नारायण राणे (narayan rane ) यांनी केली आहे. (narayan rane addressing press conference)

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कोकणातील शिवसेनेच्या 11 आमदारांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवण्यात येतील. कोकणातून शिवसेनेला हद्दपार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता 56 आमदार घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेची संख्या कमी होईल, असा दावाही नारायण राणे यांनी केला. शिवसेनेचे 145 आमदार निवडून आलेले नाहीत आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यामुळे  तुमचे आमदार किती असं त्यांना लोक विचारतील. त्यामुळेच ते पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

कोकणातील हे 11 आमदार विधानसभेत कोकणातील विकासा संदर्भात बोलतात का? जाहीर केलेला फंडही सरकार देत नाहीत. त्यामुळे आमदार काहीही करू शकत नाही. पालकमंत्री तर निष्क्रीय आहे. काही कामाचे नाहीत. ते जिल्ह्यात येऊन काय करतात हे एक दिवस सांगेन, असा इशाराही त्यांनी दिला. शिवसेनेचे आमदार विधानसभेत नाही बोलले तरी कोकणाचा विकास थांबवायचा नाही हे आम्ही ठरवलं आहे. कोकणातील विकासाला चालना मिळालीच पाहिजे. त्यासाठी भाजप आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

कोण आहेत अब्दुल सत्तार?

यावेळी त्यांनी ठाकरे सरकारमधील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही टीका केली. कोण आहेत अब्दुल सत्तार? त्यांना कोकणाची काय माहिती आहे? ते बोलून चालून राज्यमंत्री. राज्यमंत्र्याला काय अधिकार असतो? महसूलमंत्री काँग्रेसचा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या राज्यमंत्र्याला कोण विचारतंय?, असं सांगतानाच अब्दुल सत्तार काहीही बडबडतात. गेल्या चाळीस वर्षांपासून मी त्यांना ओळखतो. पूर्वी अशोक चव्हाणांच्या मागेमागे फिरायचे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. (narayan rane addressing press conference)

संबंधित बातम्या:

अशा मूर्खांपासून माझ्या कोकणाला आता देवानेच वाचवावे, नितेश राणेंचा राऊतांवर प्रहार

‘मुंबईच्या वाट्याला जाऊ नका’, एकनाथ गायकवाड यांचा मोदी सरकारला इशारा

(narayan rane addressing press conference)

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.