Breaking : नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट! तब्बल 9 तासाच्या चौकशीनंतर राणेंचा पवारांवरही निशाणा!

मालवणी पोलिसांकडून नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांची आज मालवणी पोलिसांकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. जबाब नोंदवल्यानंतर नारायण राणे पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. त्यावेळी राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.

Breaking : नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट! तब्बल 9 तासाच्या चौकशीनंतर राणेंचा पवारांवरही निशाणा!
नारायण राणे, नितेश राणे यांची मालवणी पोलिसांकडून तब्बल 9 तास चौकशीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 11:36 PM

मुंबई : दिशा सालियान (Disha Salian) मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी गंभीर आरोप केले आहेत. याच प्रकरणात मालवणी पोलिसांकडून नारायण राणे आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची आज मालवणी पोलिसांकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. जबाब नोंदवल्यानंतर नारायण राणे पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. त्यावेळी राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. इतकंच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्यानंतर माझा जबाब नोंदवला गेला आणि मग आम्हाला सोडण्यात आल्याचं राणेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

‘किशोरी पेडणेकरांनी खोटी केस करायला लावली’

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. ‘मला दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यातून एक नोटीस आली होती. आपण आपलं म्हणणं सांगण्यासाठी पोलीस ठाण्यात यावं अशी ती नोटीस होती. त्यात दिशा सालियानच्या आईने तक्रार केल्यामुळे तुम्हाला तुमचं म्हणणं सांगायला बोलावण्यात आलं आहे. दिशाबाबत जे काही मी आणि नितेश पत्रकार परिषदेत बोललो होतो. तिचे खरे आरोपी पकडले पाहिजेत. तिने आत्महत्या केली नसून ती हत्या आहे, असं मी वारंवार बोलत होतो. त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या दिशाच्या आईकडे गेल्या. त्यांना तक्रार करण्यासाठी प्रवृत्त केलं. आईला खोटी तक्रार करायला लावली’, असा गंभीर आरोप राणेंनी केलाय.

‘अमित शाहांना फोन केल्यावर सोडलं’

राणे पुढे म्हणाले की, ‘मला 9 तास बसवून घेतलं. मी सांगतोय मी केंद्रीय मंत्री आहे, नितेश आमदार आहे. आम्हाला अधिकार आहे कुणावर अन्याय होत असेल तर न्याय मिळवून द्यावा. आम्ही दिशाला न्याय देण्याची मागणी करत आहोत. आम्ही अटकपूर्व जामीन घेतला. शेवटी मी अमित शहांना फोन केला. त्यानंतर माझा आणि नितेशचा जबाब घेतला आणि मग आम्हाला सोडलं’, असंही राणेंनी माध्यमाशी बोलताना सांगितलं.

मुख्यमंत्र्यांचा दोन वेळा फोन, राणेंचा गौप्यस्फोट

‘माझ्या जबाबात मी सुरुवातीपासून घडलं ती माहिती आणि आम्ही जे बोलत होतो ते सांगितलं. एवढंच नाही तर दिशा सालियानची 8 जून आणि सुशांतची 13 जूनला हत्या झाल्यानंतर मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांचा दोन वेळा फोन आला की, तुम्ही सुशांत आणि दिशाच्या केसबाबत बोलू नका. एका मंत्र्याची गाडी होती असं बोलू नका. मी बोललो मी एक लोकप्रतिनिधी आहे, का बोलू नको? तर तु्म्हालाही मुलं आहेत, तुम्ही असं काही करु नका. मात्र, माझं हे वाक्य माझ्या जबाबातून वगळण्यात आलं आहे. याचाच अर्थ हा सर्व प्रकार राजकीय हेतूने प्रेरित आहे. कोणावर अन्याय होत असेल तर आम्ही अन्यायाविरोधात आवाज उठवणारचं. आमच्या आयुष्यातून 5 तास घेतले म्हणजे फार काही फरक पडणार नाही. दिशा सालियानची माझ्या माहितीप्रमाणे केस बंद करण्यात येतेय. ज्या लोकांनी अत्याचार केला त्यांना संरक्षण देण्याचं काम हे सरकार करत आहे. पण मी शेवटपर्यंत आवाज उठवत राहणार’, असा इशाराही राणेंनी ठाकरे सरकारला दिलाय.ट

राणेंचा पवारांवरही निशाणा

मी पवार साहेबांचंही वक्तव्य ऐकलं. पवार साहेब म्हणाले राणेंनाही अटक झाली होती. त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा का घेतला नाही. वा पवार साहेब… काय बोलावं की आपली कीव करावी मला कळत नाही. माझा कुणी दाऊद दोस्त नाही. आमचा कधी संबंध आला नाही. तो देशद्रोही आहेत. आमचे हजारो लोकं बॉम्बस्फोटात मेले आहेत. त्या दाऊदशी नवाब मलिकचे संबंध आहेत. त्यामुळे त्याला अटक झाली. त्यामुळेच आम्ही त्यांचा राजीनामा मागतोय. आणि तुम्ही आमचा राजीनामा मागताय. मागा ना… हेच तर केली तुम्ही आयुष्यभर, हीच तर तुमची पुण्याई, अशा शब्दात राणेंनी पवारांवरही निशाणा साधला.

इतर बातम्या :

Video : साताऱ्यातला ‘तो’ पाऊस आणि ‘ती’ निवडणूक; शरद पवारांकडून श्रीनिवास पाटलांचं तोंडभरून कौतुक

Video : शरद पवारांचा राज्यपाल कोश्यारींना जोरदार टोला, तर फडणवीसांचं पवारांना प्रत्युत्तर

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.