‘नारायण राणे डगमणारे नेते नाहीत, ते खंबीर’, रामदास आठवले राणेंच्या भेटीला, अमित शाहांना माहिती देण्याचा सल्ला

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नारायण राणे यांची त्यांच्या जुहू इथल्या घरी जात भेट घेतली. तसंच आठवले यांनी नारायण राणेंना रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा दिला आहे. राणेंवर झालेली कारवाई ही अन्यायकारक आणि चुकीची असल्याचा आरोपही आठवले यांनी केलाय.

'नारायण राणे डगमणारे नेते नाहीत, ते खंबीर', रामदास आठवले राणेंच्या भेटीला, अमित शाहांना माहिती देण्याचा सल्ला
रामदास आठवले नारायण राणेंच्या भेटीला
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 10:43 PM

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक व जामीन नाट्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. भाजप नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात चांगलेच आक्रमक झालेत. ठाकरे यांच्याविरोधात यवतमाळ आणि नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. अशावेळी आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नारायण राणे यांची त्यांच्या जुहू इथल्या घरी जात भेट घेतली. तसंच आठवले यांनी नारायण राणेंना रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा दिला आहे. राणेंवर झालेली कारवाई ही अन्यायकारक आणि चुकीची असल्याचा आरोपही आठवले यांनी केलाय. (Ramdas Athavale met Narayan Rane, Advise Rane to inform Amit Shah)

नारायण राणे हे प्रदीर्घ अनुभव घेतलेले नेते असून त्यांच्यावर झालेली पोलिसी कारवाई अन्यायकारक चुकीची आहे. अशा प्रसंगांना पुरून उरणारे निर्भीड नेते नारायण राणे असून त्यांच्या या प्रसंगात रिपब्लिकन पक्ष नारायण राणे यांच्या पाठीशी असल्याचे सांगत ना रामदास आठवले यांनी नारायण राणे यांना पाठिंबा दिला. यावेळी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, एम एस नंदा, प्रकाश जाधव, आदी पदाधिकारी उपस्थित होते. नारायण राणे अशा प्रसंगांमुळे डगमणारे नेते नाहीत. ते खंबीर आहेत. निडर अहेत. त्यांनी दिल्लीत येऊन झालेल्या प्रकाराची गृहमंत्री अमित शहांना माहिती द्यावी. राणे यांच्यावर झालेली कारवाई अत्यंत चुकीची आहे, असं आठवले यावेळी म्हणाले.

रामदास आठवलेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

नारायण राणे यांची जी भाषा आहे ती शिवसेनेचीच भाषा आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देताना शिवसेनेच्या भाषेतूनच उत्तर द्यायचं होतं. पण तसं न करता चुकीच्या पद्धतीनं कारवाई केल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलाय.

यापूर्वी अनेक शिवसेना नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी असं व्यक्तव्य केलं आहे. त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल झाले, पोलिसांनी पकडलं दाखवा, असं आव्हानच रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलंय. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना भाषणातून उत्तर द्यायला हवं होतं. पण पोलिसांकडून कारवाई करुन घेतली ती चुकीची आहे. पोलिसांची यात चूक नाही. पोलिसांच्या माध्यमातून सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई चुकीची आहे, त्यांनी काही गुन्हा केलेला नाही, अशा शब्दात रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय.

कोर्टाकडून राणेंना अटीशर्तीसह जामीन

जामीन मंजूर करताना महाड कोर्टानं काही अटी घातल्या आहेत. राणे यांना 15 हजार रुपयाच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच त्यांना भविष्यात असं वक्तव्य करता येणार नाही. ऑडिओ चेक करण्यासाठी राणे यांना एकदा पोलीस ठाण्यात यावं लागणार आहे. त्यासाठी राणे यांना 7 दिवस आधी नोटीस दिली जाईल. त्याचबरोबर 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान, कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड कोर्टानं राणेंना बजावलं आहे.

संबंधित बातम्या :

संजय राऊत संपादक पदासाठी लायक नाहीत, राणेंचा घणाघात; ‘संभल जाओ, सुधर जाओ’, राऊतांचं प्रत्युत्तर

‘भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू’, विनायक राऊतांचा जोरदार टोला

Ramdas Athavale met Narayan Rane, Advise Rane to inform Amit Shah

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.