Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ कोंबड्यांसाठीच सरकार बनवण्याचं भाकीत, नवाब मलिकांचा नारायण राणेंवर पलटवार

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास सरकार लवकरच पडणार असल्याचा दावा केलाय. राज्यातील आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळणार असून मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. राणेंच्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राणेंवर जोरदार पलटवार केलाय.

'त्या' कोंबड्यांसाठीच सरकार बनवण्याचं भाकीत, नवाब मलिकांचा नारायण राणेंवर पलटवार
नवाब मलिक, नारायण राणे
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 4:29 PM

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला नुकतेच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. सुरुवातीच्या काळात आघाडी सरकार पाडण्याच्या वल्गना भाजप नेत्यांकडून केल्या जात होत्या. पुढे हा सूर बदलला आणि हे सरकार आपल्याच ओझ्यानं पडेल असा दावा भाजप नेते करु लागले. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास सरकार लवकरच पडणार असल्याचा दावा केलाय. राज्यातील आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळणार असून मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. राणेंच्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राणेंवर जोरदार पलटवार केलाय.

राज्यात अनागोंदी कारभार आहे. भाजपचं सरकार नाही त्यामुळे असं होत आहे. मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, असं राणे म्हणाले. राणे यांच्या या दाव्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून जोरदार टीका सुरु झालीय. सरकार पडेल ही भविष्यवाणी करुन देवेंद्र फडणवीस थकले. त्यानंतर चंद्रकांत पाटीलही बोलायचे. आता नारायण राणे यांनी भविष्यवाणीचं टेंडर घेतलं आहे. काही लोकांकडे 23 वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता त्या कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावं लागतंय, असा जोरदार टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

राज्यात अनागोंदी कारभार आहे. भाजपचं सरकार नाही त्यामुळे असं होत आहे. मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील मविआ सरकार फार काळ टिकणार नाही, असं राणे म्हणाले. त्याचबरोबर माझ्या मनात काही गोष्टी आहेत. त्या आताच सांगणार नाही. सरकार पाडायचं असेल किंवा नवं सरकार आणण्यासाठीच्या काही करायचं असेल तर अशा गोष्टी उघड बोलायच्या नसतात, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी आहेत. आजारी माणसाचं नाव घेऊन काही बोलणं योग्य नाही. पण आघाडी सरकारचं लाईफ अधिक नाही, असंही ते म्हणाले.

अनिल परब यांचाही राणेंना टोला

नारायण राणे यांनी केलेल्या दाव्याबाबत परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनीही जोरदार टोला लगावलाय. नारायण राणे काय म्हणतात त्यावर सरकार चालत नाही. तर संख्याबळावर चालतं, असं अनिल परब म्हणाले.

इतर बातम्या : 

Vidhan Parishad Election : मुंबई, कोल्हापूर, धुळे-नंदुरबारमध्ये साटंलोटं! नागपूर आणि अकोल्यात मात्र तगडी फाईट, वाचा सविस्तर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे सर्व अहवाल नॉर्मल, वयाच्या 85 व्या वर्षीही अण्णा तंदरुस्त

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.