पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे : नारायण राणे

पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे, असा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी केला (Narayan Rane on Shivsena Nanar Project stand).

पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे : नारायण राणे
Follow us
| Updated on: Aug 08, 2020 | 3:00 PM

सिंधुदुर्ग : भाजपचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे, असा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी केला (Narayan Rane on Shivsena Nanar Project stand). यावेळी त्यांनी शिवसेनेच्या नाणार प्रकल्पवरील भूमिकेवरही टीका केली. तसेच शिवसेना दुटप्पी असल्याचा टोला लगावला. ते विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते.

नारायण राणे म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी नाणारमधील काही लोकांनी नाणार प्रकल्पाला समर्थन दिलं. त्यात 80 टक्के शिवसैनिक होते. पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही. पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. हे शिवसेनेचे घुमजाव आहेत. ही स्थानिक जनतेची फसवणूक आहे.”

नाणारबाबत आपली भूमिका व्यक्त करताना नारायण राणे यांनी जनता ज्या दिशेने जाईल त्या दिशेने आम्ही जाणार असल्याचं म्हटलं.

विजयदुर्ग किल्ल्याची नारायण राणेंकडून पाहणी

राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी केली. चार दिवसांपूर्वी या किल्ल्याची तटबंदी अतिवृष्टीमुळे कोसळली होती. या पाहणी दौऱ्यात राणेंसोबत त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे हेही सोबत होते. पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले की, “विजयदुर्ग किल्ल्याची पडझड झाली असून आपण आता पाहणी केली आहे. संबंधित मंत्र्यांशी बोलून या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार आहे. अधिवेशनात ही मागणी करणार असल्याचे यावेळी राणे म्हणाले.

दरम्यान, याआधी नारायण राणे यांनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह  राजपूत आत्महत्येच्या चौकशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. “सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याची पोलिसांनी चौकशी का केली नाही, माझ्या माहितीनुसार तिने आत्महत्या केली नाही, तर तिची देखील हत्या केली आहे. तिच्यावर बलात्कार करुन तिला मारण्यात आलं आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करायला हवा,” असे नारायण राणे म्हणाले होते.

“सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला वाचवतंय,” असा प्रश्नही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला होता.

“सुशांतच्या घराजवळ एक बंगला आहे. तिथे रोज काही मंत्री येतात. ते तिथे तीन तास काय करतात? 13 तारखेला ते तिथे जमले आणि तिथून सुशांतच्या घरी गेले. तिथे मंत्री गेले असतील तर कॅमेऱ्यात त्यांचा ताफा वगैरे ते येणार नाहीत. सगळ्यांना माहिती आहे कोण आहे ते, ज्याअर्थी जेवढा दबाव सरकार आणि पोलिसांवर येतोय, अधिकारी वाचवायचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना मी सांगू इच्छितो, हे होऊ शकणार नाही. विरोधी पक्ष सक्षम आहे. तो अशा गोष्टी होऊ देणार नाही,” असेही नारायण राणे म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

वरुण सरदेसाई सांभाळून बोल, तू लहान आहेस, आमच्याकडे तोंड बंद करण्याचे उपाय आहेत : नारायण राणे

दिशा सालियनची बलात्कार करुन हत्या, सुशांत प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला वाचवतंय? : नारायण राणे

गणेशोत्सवात चाकरमान्यांना ‘कोकणबंदी’ केली तर आंदोलन, राणे आक्रमक

Narayan Rane on Shivsena Nanar Project stand

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.