बाळासाहेबांमुळे आतापर्यंत शांत आहे, दादागिरी केलीत तर ‘मातोश्री’च्या आतलं आणि बाहेरचं सगळं बाहेर काढेन : नारायण राणे

कुणाला बेडूक म्हणताय? आम्ही वाघ होतो म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री केलं. ते असते तर तुम्हाला कधीच मुख्यमंत्री केलं नसतं, असं सांगतानाच राणे कुटुंब आणि भाजपवर टीका कराल तर याद राखा. गेल्या 40 वर्षात जे पाहिलं-ऐकलं ते बाहेर काढेल तर पळता भूई थोडी होईल, असा इशारा भाजपचे नेते, खासदार नारायण राणे यांनी दिला.

बाळासाहेबांमुळे आतापर्यंत शांत आहे, दादागिरी केलीत तर 'मातोश्री'च्या आतलं आणि बाहेरचं सगळं बाहेर काढेन : नारायण राणे
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 4:53 PM

मुंबई: कुणाला बेडूक म्हणताय? आम्ही वाघ होतो म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री केलं. ते असते तर तुम्हाला कधीच मुख्यमंत्री केलं नसतं, असं सांगतानाच राणे कुटुंब आणि भाजपवर टीका कराल तर याद राखा. दादागिरी कराल तर गेल्या 40 वर्षातलं ‘मातोश्री’तलं आतलं-बाहेरचं सगळं बाहेर काढेन, असा इशारा भाजपचे नेते, खासदार नारायण राणे यांनी दिला. (narayan rane reaction on cm uddhav thackerays dussehra rally speech)

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची खिल्ली उडवत जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांनी उगाच वाघ असल्याचा आव आणू नये. खालच्या स्तरावरची भाषा वापरू नये. केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर असल्याने मी शांत आहे. दादागिरी केली तर मातोश्रीच्या आतलं आणि बाहेरचं सगळं बाहेर काढेन, असा इशारा राणेंनी दिला. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण शिवराळ आणि निर्बुद्ध होतं. आजवरच्या मुख्यमंत्र्यांनी कधीच असं भाषण केलं नव्हतं. आजवरच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषण शैलीने आणि विचाराने पदाची आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. पण कालच्या भाषणात शिवराळपणा सोडून काय होते? भाषणात कसलाही ताळमेळ नव्हता. ते काहीही बरळत होते. कुठेही कॉमा नव्हता आणि फुलस्टॉपही नव्हता. आपण काय बोलतो? कुणाबद्दल बोलतो? याचंही त्यांना भान नव्हतं, अशी टीका त्यांनी केली.

हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही

उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्याकडे नैतिकता नाही. निवडणुकीआधी भाजपसोबत युती केली. मोदींच्या नावावर 56 खासदार निवडून आले. ते नसते तर 25 खासदारही निवडून आले नसते. उद्धव ठाकरेंनी बेमानी करुन मुख्यमंत्रीपद मिळवले. त्यांनी 56 आमदारांसाठी बेईमानी केली, अशी टीकाही राणेंनी केली.

आदित्यला क्लीन चिट देण्यासाठी मेळावा

कालचा दसरा मेळावा केवळ आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट देण्यासाठी होता. जनतेसाठी नव्हताच, असं सांगतानाच आम्ही दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणात कधीही आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं नाही. त्यांनी क्लीन चिट दिली म्हणून आम्हाला बोलावं लागलं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सुशांतची आत्महत्या नाही, तो खून आहे. आरोपी आज ना उद्या गजाआड जातील. त्यात त्यांचा पूत्र आदित्य ठाकरे तुरुंगात जाईल. आज मी स्पष्ट बोलतो. ते सत्तेचा दुरुपयोग करुन मुलाला वाचवत आहेत. सुशांतच्या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल. त्याला कुणी मारलं आणि दिशाचा बलात्कार कुणी केला, तिला वरुन खाली कोणी टाकलं हे सर्व बाहेर येईल. या माणसाने त्याच्या आयुष्यात काहीही केलेलं नाही. इतरांच्या मदतीनेच कामं केली.

बेडूक नव्हतो वाघ होतो

कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे पिंजऱ्यात होते आत्ता कुठे एका दौऱ्याला बाहेर पडले. हे स्वतःला वाघ म्हणतात. हे पिंजऱ्यातील वाघ आहेत का? सभेत केवळ 47 लोक टाळ्या वाजवायला होते. मी शिवसेनेत होतो, अनेक पदं भुषवली. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक पदं दिलं. मी बेडूक नव्हतो. हे बेडूक आहेत म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं नाही. बाळासाहेब असते तर त्यांना मुख्यमंत्री केलं नसतं, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला.

स्वत:ला वाघ समजता कधी कोणाच्या कानफटात तरी मारली का? आम्ही शिवसेना उभी केली. आम्ही शिवसैनिकांनी अंगावर केसेस घेतल्या. तुम्ही नाही घेतल्या. तुम्ही तर शेळपट आहात, असा हल्लाही त्यांनी चढवला. वाघ आहात तर बाहेर या. घरात काय बसता. वाघ पिंजऱ्यातले आहात की बाहेरचे हे तरी दाखवून द्या, असे आव्हानच त्यांनी दिले. (narayan rane reaction on cm uddhav thackerays dussehra rally speech)

कुठे आहेत रोजगार?

मुख्यमंत्र्यांनी 16 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणल्याचं सांगितलं. कुठं आहे ती गुंतवणूक कोठे आहे, फक्त कागदावर आहे. मी उद्योगमंत्री असताना 30 हजार कोटी रुपये उभे केले आणि कंपन्या सुरु केल्या. यांच्या कंपन्या कुठे आहेत? रोजगार कुठे आहेत?, असा सवाल त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

आमच्याकडे नजर फिरवू नका, नाहीतर पळता भुई थोडी होईल : नारायण राणे

उद्धव ठाकरेंनी बेईमानी करून मुख्यमंत्री पद मिळवलं, नारायण राणेंचा घणाघात

कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही का?, नारायण राणेंचा सवाल

(narayan rane reaction on cm uddhav thackerays dussehra rally speech)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.