AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या पालखी मार्गांचे भूमिपूजन, कसा असेल सोहळा?

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या पालखी मार्गांचे भूमिपूजन, कसा असेल सोहळा?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन होणार
| Edited By: | Updated on: Nov 07, 2021 | 10:30 PM
Share

मुंबई : वारकरी संप्रदायासाठी उभारण्यात येत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही मार्गाच्या चौपदरीकरणाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी विशेष समर्पित पदपथ बांधला जाणार आहे. (Bhumi Pujan of Palkhi Marg tomorrow at the hands of PM Narendra Modi)

संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग हा पंढरपूर ते आळंदी असा असेल. तर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग देहू ते पंढरपूर असा असणार आहे. उद्या दुपारी साडे तीन वाजता हा भूमिपूजन सोहळा पार पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (NH-965) पाच विभागांचे चौपदरीकरण, तर श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या (NH-965G) तीन विभागाचे चौपदरीकरण होणार आहे.

वारकऱ्यांसाठी स्वतंत्र पदपथाची निर्मिती

दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरला जात असतात. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला पालखीसाठी समर्पित पदपथ बांधले जाणार आहेत. त्यामुळे भाविकांना त्रासमुक्त आणि सुरक्षित रस्ता मिळेल. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर दिवेघाट ते मोहोळ असा सुमारे 221 किलोमीटर, तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर पाटत ते तोंडळे-बोंडाळे असा सुमारे 130 किलोमीटरचे चौपदरीकरण आणि वारकऱ्यांसाठी पदपथाची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी अनुक्रमे 6 हजार 690 कोटी आणि 4 हजार 400 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येणार आहे.

पंढरपूरला जोडणाऱ्या अन्य महामार्गांचे लोकार्पण

भूमिपूजन समारोहावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंढरपूरला जोडणाऱ्या 223 किलोमीटरपेक्षा अधिक पूर्ण झालेले आणि सुधारित रस्ते प्रकल्पाचं लोकार्पण करतील. त्याची अंदाजे किंमत 1 हजार 180 कोटी रुपये असणार आहे. यात म्हसवड-पिलिव-पंढरपूर (NH-548E), कुर्डूवाडी-पंढरपूर (NH-965C), पंढरपूर-सांगोला (NH-965C), त्याचबरोबर NH-561A चा टेंभुर्णी-पंढरपूर विभाग आणि पंढरपूर-मंगळवेळा-उमदी विभागाचा समावेश असेल.

कसा असेल संपूर्ण रस्ते प्रकल्प?

इतर बातम्या :

निलेश राणेंविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार, गुलाबराव पाटलांवरील टीकेनंतर शिवसेना आक्रमक

‘महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरु, महाविकास आघाडी भलत्याच कामात व्यस्त’, राजू शेट्टींचा टोला

Bhumi Pujan of Palkhi Marg tomorrow at the hands of PM Narendra Modi

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.