बाळासाहेबांचा फोटो, कठपुतली आणि विचारांचा दाखला, पोस्टरमधून शिवसेनेची तुफान फटकेबाजी

नाशिकमध्ये एका गणेश मंडळाने देखाव्यादरम्यान शिवसेनेच्या वतीने लावण्यात आलेलं एक होर्डिंग चांगलंच चर्चेचा विषय ठरत आहे. इंदिरानगर परिसरात शिवसेना प्रणित इंदिरानगर युवक मित्र मंडळातर्फे यंदा कठपुतलीचा देखावा उभारण्यात आला आहे.

बाळासाहेबांचा फोटो, कठपुतली आणि विचारांचा दाखला, पोस्टरमधून शिवसेनेची तुफान फटकेबाजी
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 4:51 PM

नाशिक : दसरा मेळाव्याचा वाद यासोबतच अमित शहा (Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्यानंतर महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. असं असतानाच नाशिकमध्ये एका गणेश मंडळाने देखाव्यादरम्यान शिवसेनेच्या वतीने लावण्यात आलेलं एक होर्डिंग चांगलंच चर्चेचा विषय ठरत आहे. इंदिरानगर परिसरात शिवसेना प्रणित इंदिरानगर युवक मित्र मंडळातर्फे यंदा कठपुतलीचा देखावा उभारण्यात आला आहे. या देखाव्याच्या बाजूलाच मुख्य रस्त्यावर भले मोठे होर्डिंग लावण्यात आले आहे. ‘कठपुतलीला विचार नसतो, दोरी ज्याच्या हातात त्याच्याच विचारांनी नाचावं लागत’ असा मजकूर छापत शिंदेगटाला लक्ष्य करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यातील ‘विचारांनी’ या शब्दाला भाजपच्या झेंड्याचा रंगही देण्यात आला असून या मजकुरा शेजारीच बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा फोटोही आहे.

राज्यातील सत्तासंघर्षात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच गणेश उत्सवाच्या निमित्ताने राजकारण्यांच्या गाठीभेटी देखील वाढलेल्या आहेत. आणि ह्याच राजकीय खेळी बघता मंडळांनी देखील टीका करण्याची संधी सोडलेली नाहीये. अशीच काहीशी संधी नाशिकच्या युवक मित्र मंडळाने हेरली. कठपुतलीचा देखावा उभारत अगदी शिंदे गटासह भाजपवर निशाणा साधला.

‘कठपुतलीला विचार नसतो, दोरी ज्याच्या हातात त्याच्याच विचारांनी नाचावच लागत’ असा मजकूर छापत शिंदे गटाला लक्ष केल्यानं हि जहरी टीका असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेचे पदाधिकारी असलेले संजय गायकर हे ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक आहे. इंदिरानगर युवक मित्र मंडळाचे ते संस्थापक आहे.

हे सुद्धा वाचा

जनतेला प्रबोधन करण्याचे काम आम्ही या देखाव्यातून केले आहे. शिंदे सरकार कोणाच्या ईशाऱ्यावर चालते आहे, कोणाच्या हातात कठपुतलीच्या दोऱ्या आहेत हे सगळ्यांना माहीत आहे.. शिवतीर्थावर दसरा मेळावाही उद्धव साहेबांचाच होणार आहे, असं संजय गायकर म्हणाले आहेत.

दसरा मेळावा हा राज्यातील शिवसैनिकांचा आणि विशेषतः शिवसेनेच्या दृष्टीने महत्वाचा विषय असल्यानं सर्वांचंच त्याकडे लक्ष लागलेले आहे. शिंदे यांचा दसरा मेळावा कुठे होणार ? ठाकरे यांचा दसरा मेळावा कुठे होणार ? आणि कोण काय काय बोलणार याची उत्स्कुता शिगेला पोहचली आहे. अशातच शिवसैनिकांनी लावलेलं हे होर्डिंग चर्चेत आलं असून राजकीय वर्तुळात त्याची मोठी चर्चा होत आहे.

मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या.
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी.
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार.
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप.
'मुन्नी बदनाम हुई अशी अवस्था...', सुरेश धस यांचा नेमका रोख कुणावर?
'मुन्नी बदनाम हुई अशी अवस्था...', सुरेश धस यांचा नेमका रोख कुणावर?.
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'.
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही.
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी.
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल...
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल....
'अण्णा, ॐ नमः शिवाय!', पोलीस अधिकारी अन् कराडचं फोनवरील संभाषण व्हायरल
'अण्णा, ॐ नमः शिवाय!', पोलीस अधिकारी अन् कराडचं फोनवरील संभाषण व्हायरल.