Nasik nmc election 2022, Ward 13 : भाजप बालेकिल्ला राखणार की गमावणार?; प्रभाग क्रमांक 13कडे सर्वांचे लक्ष!
Nasik nmc election 2022, Ward 13 : 2017मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13मधील चारही वॉर्डात भाजपचे उमेदवार जिंकून आले होते. प्रभाग क्रमांक 13 अ मधून गजानन शेलार, ब मधून वत्सला खैरे, क मधून शाहू खैरे आणि ड मधून सुरेखा भोसले आदी विजयी झाले आहेत.
नाशिक: नाशिकमध्येही निवडणुकीचे (nmc election 2022) वारे जोरात वाहू लागले आहेत. प्रत्येकवेळी वेगवेगळ्या राजकीय पक्षाला महापालिकेत संधी देणारे नाशिककर (Nasik) यंदा कुणाला संधी देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या नाशिक महापालिकेत भाजपची (bjp) सत्ता आहे. त्यामुळे यंदा महापालिकेत कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाशिक महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना आणि मनसेनेही जोर लावला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे नाशिकमध्ये येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या गेल्या आहेत. तसेच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी करण्यावरही जोर देण्यात आला आहे. दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊतही नाशिकमध्ये सातत्याने येत आहेत. नाशिकमधील आमदारांनी बंड केल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचं काम सुरू आहे. तर सत्ता राखण्यासाठी भाजपनेही जोरदार मोर्चेबांधणी केल्याने नाशिक कुणाचे? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपचं वर्चस्व
2017मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13मधील चारही वॉर्डात भाजपचे उमेदवार जिंकून आले होते. प्रभाग क्रमांक 13 अ मधून गजानन शेलार, ब मधून वत्सला खैरे, क मधून शाहू खैरे आणि ड मधून सुरेखा भोसले आदी विजयी झाले आहेत. मात्र, आता मतदार संघाची फेररचना झाल्याने प्रभाग क्रमांक 13 मधील अनेक एरिया बदलले आहेत. त्यामुळे हा वॉर्ड नव्याने अस्तित्वात आला असून आता या वॉर्डातून हे चारही नगरसेवक निवडणूक लढवणार की अन्य कुणी उभे राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
प्रभाग क्रमांक 13 अ
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
तीन वॉर्ड, तीनच संधी
गेल्यावेळी एका प्रभागात चार वॉर्ड होते. आता तीन वॉर्ड आहेत. त्यामुळे चार नगरसेवकांपैकी एकाचा पत्ता यंदा कट होणार आहे. तसेच अ हा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाला आहे. तर ब आणि क हा खुला आहे. त्यामुळे पुरुष उमेदवारांना केवळ दोनच मतदारसंघात संधी आहे. तर महिला उमेदवारांना मात्र तिन्ही वॉर्डातून मैदानात उतरता येणार आहे.
लोकसंख्या किती?
नव्या मतदारसंघाची लोकसंख्या 35 हजार 509 एवढी आहे. या मतदारसंघात अनुसूचित जातीचे मतदार 4588 तर अनुसूचित जमातीचे मतदार 1984 इतके आहेत. म्हणजे काही मतदारसंघात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे मतदार आपला नगरसेवक कोण असणार हे ठरवणार आहेत.
प्रभाग क्रमांक 13 ब
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
प्रभाग कुठून कुठपर्यंत?
नव्या प्रभागात अनेक नवे विभाग आले आहेत. पिंपळगाव बहुला, विश्वासनगर, सातमाऊली चौक, श्रमिक नगर परिसर, राधाकृष्ण नगर आणि संभाजीनगर आदी परिसर या प्रभागात येतात.
प्रभाग क्रमांक 13 क
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
2017मधील पक्षीय बलाबल
भाजप- 67 शिवसेना- 34 काँग्रेस- 6 राष्ट्रवादी – 6 मनसे 5 एकूण-122