NMMC Election 2022 : पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने निवडणूक; प्रभाग क्रमांक 15मध्ये काय होणार?
पूर्वी वॉर्ड पद्धत होती. त्यामुळे 2017च्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 15 मधून संगिता अशोक पाटील या विजयी झाल्या होत्या. संगिता पाटील या भाजपच्या नगरसेविका आहेत. त्यांनी महापालिकेत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे.
नवी मुंबई: यंदाची नवी मुंबई महापालिकेची (Navi Mumbai Municipal Corporation) निवडणूक अत्यंत वेगळी असणार आहे. नवी मुंबईकरांना वेगळा अनुभव देणारी असणार आहे. कारण यंदा नवी मुंबई महापालिकेची निवडणूक प्रथमच प्रभाग पद्धतीने होत आहे. कारण नवी मुंबई (Navi Mumbai) महापालिकेची निवडणूक सलग सहावेळा वॉर्ड पद्धतीने झाली होती. एक वॉर्ड एक नगरसेवक (corporator) अशी निवडणुका झाल्या होत्या. यंदा नवी मुंबईकरांना एका प्रभागतून तीन नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. त्यामुळेच ही निवडणूक अत्यंत वेगळी ठरणारी आहे. पहिल्यांदाच नवी मुंबईत प्रभाग पद्धतीने निवडणूक होत असल्याने पालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रभाग पद्धतीत सत्ता राहील की नाही? अशी धाकधूक या सत्ताधाऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. तर प्रभाग पद्धतीत आपण निवडून येऊ की नाही, अशी भीती विद्यमान नगरसेवकांमध्ये निर्माण झाली आहे.
फक्त एकच संधी
प्रभाग क्रमांक 15 मध्ये अ, ब आणि क हे तीन वॉर्ड येतात. त्यात अ हा वॉर्ड ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे. ब हा वॉर्ड सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. तर क हा वॉर्ड सर्वांसाठी खुला आहे. म्हणजे पुरुषांना केवळ वॉर्ड क मधूनच निवडणूक लढवण्याची संधी आहे.
प्रभाग 15 अ
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवा |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
पूर्वी वॉर्ड, आता प्रभाग
पूर्वी वॉर्ड पद्धत होती. त्यामुळे 2017च्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 15 मधून संगिता अशोक पाटील या विजयी झाल्या होत्या. संगिता पाटील या भाजपच्या नगरसेविका आहेत. त्यांनी महापालिकेत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. आता प्रभाग पद्धतीत तीन वॉर्ड ठेवण्यात आले आहेत. वॉर्डाची फेररचना झाल्याने प्रभाग 15 हा नवीन प्रभाग अस्तित्वात आला आहे. त्यामुळे या प्रभागातून तीन नगरसेवक निवडून येणार आहेत. संगिता पाटील या आता कोणत्या प्रभागातून उभ्या राहतात याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागलं आहे.
26 हजार लोक ठरवणार नगरसेवक
नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 ची एकूण लोकसंख्या 26 हजार 284 आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 2351 एवढी आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 283 आहे.
प्रभाग 15 ब
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
प्रभाग कुठून कुठपर्यंत
प्रभाग क्रमांक 15मध्ये कोपरखैरणे गांव, कोपरखैरणे गावियो सेक्टर-19, सेक्टर-20, सिडको होल्डिंग पॅड, कोपरखैरणे गावठाण व इतर परिसर येतात. त्यामुळे या परिसरातील लोक कोणत्या तीन उमेदवारांना नगरसेवक म्हणून निवडतात हे पाहणे औत्सुक्याचं आहे.
प्रभाग 15 क
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |