हरभजन सिंग यांची मुलगी, रवी राणांची बायको, नवनीत राणांच्या सर्टिफिकेटवर जात कोणती?

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांची खासदारकी अडचणीत आली आहे. कारण, हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र (Caste certificate) रद्द ठरवलं आहे.

हरभजन सिंग यांची मुलगी, रवी राणांची बायको, नवनीत राणांच्या सर्टिफिकेटवर जात कोणती?
नवनीत राणा, रवी राणा
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 3:19 PM

मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांची खासदारकी अडचणीत आली आहे. कारण, हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र (Caste certificate) रद्द ठरवलं आहे. इतकंच नाही तर नवनीत राणा यांना दोन लाखांचा दंडही ठोठावला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. (Navneet Rana Caste certificate cancelled, What is MP Navneet Rana caste? where she belongs from)

अडसूळ यांच्या आरोपानुसार नवनीत राणा या मूळच्या पंजाबच्या आहेत, तिथे त्यांची लुभाणा ही जात आहे. त्या महाराष्ट्रात निवडणूक लढताना त्यांनी मोची या अनुसूचित जातीअंतर्गत निवडणूक अर्ज भरला. तर राणा यांचे पती रवी राणा हे रजपूत आहेत. अशा तीन जातींशी नवनीत राणा यांचा संबंध आहे, असा अडसूळ यांचा आरोप आहे.

नेमकं प्रकरण काय?

2019 च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसचित जातीसाठी राखीव होता. या मतदारसंघाचं नेतृत्त्व तत्कालिन शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ करत होते. 2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी त्यांचा पराभव केला. मात्र नवनीत राणांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळांनी कोर्टाचं दार ठोठावलं होतं. अखेर कोर्टानं आज नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवत त्यांना 2लाखांचा दंडही ठोठावला.

अडसूळांनी केलेल्या आरोपांनुसार नवनीत राणा या मूळ पंजाबमधल्या लुभाणा समाजाच्या आहेत. मात्र त्यांनी 2019 च्या लोकसभेसाठी अमरावतीतून अर्ज भरताना मोची ( चर्मकार ) जातीचं प्रमाणपत्र दाखवून निवडणूक लढवली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा अपक्ष लढल्या, यात प्रतिस्पर्धी आणि शिवसेनेचे बडे नेते आनंदराव अडसूळांचा 36 हजार मतांनी पराभव झाला .

नवनीत राणा अपक्ष लढल्या असल्या तरी त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा होता, याआधी 2014 च्या लोकसभेत त्यांना राष्ट्रवादीनं खासदारकीचं तिकीट दिलं होतं, मात्र तेव्हा शिवसेनेच्या आनंदराव अडसूळांनी त्यांना पराभूत केलं.

नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातल्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात पुढे असतात. अलीकडच्या काळात त्यांनी संपर्क सुद्धा वाढवलाय. मात्र नेहमी आपली विधानं आणि आक्रमकतेमुळे नवनीत राणा चर्चेत आणि वादातही राहतात. त्या अपक्ष असल्या, तरी भाजप नेत्यांआधी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस त्यांनीच सर्वात आधी केली होती.

नवनीत राणांच्या प्रतिज्ञापत्रात काय?  

नवनीत राणा यांनी 2019 मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात वडिलांच्या नावचं जात प्रमाणपत्र जोडलं होतं.  त्यानुसार अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र त्यांनी जोडलं. त्यावर त्यांचं नाव नवनीतकौर हरभजनसिंग कुंदेल्स असं आहे.  त्यासोबोत 26/08/2013 रोजी अॅफेडेव्हिट केलेला शाळा सोडल्याच्या दाखल/बोनाफाईड जोडला आहे.

यासोबत नवनीत राणा यांचा पत्ता मुंबईतील घाटकोपर इथला असल्याचं नमूद असून, हे जात प्रमाणपत्र 30 ऑगस्ट 2013 रोजी जारी करण्यात आलं होतं.

Navneet Rana caste certificate

Navneet Rana caste certificate

नवनीत राणा नेमक्या कोण आहेत?

नवनीत राणांचं लग्नाआधीचं नाव नवनीत कौर आहे

त्या मूळ पंजाबच्या असल्याचं सांगितलं जातं

राजकारणाआधी नवनीत राणांची ओळख अभिनेत्री म्हणून होती

तेलुगू, पंजाबी, हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत त्यांनी काम केलंय

2011 साली त्यांचं लग्न अमरावतीतल्या बाडनेरचे आमदार रवी राणांशी झालं

त्यानंतर अभिनय सोडून नवनीत राणा सुद्धा राजकारणात सक्रीय झाल्या

सुप्रीम कोर्टात धाव घेणार 

दरम्यान, जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे नवनीत राणा आता सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत. तिथं काय होतं, यावर त्यांच्या खासदारकीचं भवितव्य ठरणार आहे.मात्र जर खासदारकी रद्द झालीच, तर महाविकासआघाडी सरकारमुळे अमरावतीच्या लोकसभेची समीकरणं सुद्धा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नवनीत राणा राजकारणात कशा आल्या?

नवनीत राणा यांचे लग्न झाले तेव्हा रवी राणा हे अमरावतीच्या बाडनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. 2014 साली नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्य तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी चारवेळा खासदारकीची टर्म भूषविलेले शिवसेनेचे हेविवेट नेते आनंदराव अडसूळ यांच्याशी दोन हात केले. मात्र, या निवडणुकीत नवनीत राणा पराभूत झाल्या.

मात्र, 2019 च्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढताना नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा 36000 मतांनी पराभव केला. 2019 मध्ये लोकसभेत निवडून गेलेल्या त्या महाराष्ट्रातील एकमेव कलाकार होत्या.

संबंधित बातम्या 

खासदार नवनीत राणा यांना धक्का, जात प्रमाणपत्र कोर्टाकडून रद्द

Navneet Rana: कोण आहेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा म्हणणाऱ्या खासदार नवनीत राणा? 

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.