Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nawab Malik Arrested : शरद पवारांच्या उपस्थितीत ‘सिल्व्हर ओक’वर खलबतं, काँग्रेस नेतेही पवारांच्या भेटीला! मलिकांबाबत कोणता निर्णय?

मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार(, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे असे प्रमुख नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Nawab Malik Arrested : शरद पवारांच्या उपस्थितीत 'सिल्व्हर ओक'वर खलबतं, काँग्रेस नेतेही पवारांच्या भेटीला! मलिकांबाबत कोणता निर्णय?
नवाब मलिक, शरद पवार
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 5:58 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे असे प्रमुख नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे देखील शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय.

नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर ते नैतिकतेच्या मुद्द्यावरुन राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशावेळी नवाब मलिक यांच्या ताब्यातील खातं कोणत्या मंत्र्याकडे देण्यात यावं याबाबत सिल्व्हर ओकवरील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मलिक यांच्याकडे खात्याचा अतिरिक्त पदभार मंत्री हसन मुश्रिफ, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील किंवा अन्य कोणत्या नेत्याकडे दिला जावा यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

लढेंगे और जितेंगे, मलिकांची पहिली प्रतिक्रिया

नवाब मलिक हे तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांना व्हिक्टरी साईन दाखवली. लढेंगे आणि जितेंगे डरेंगे नही, असं नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलं आहे. नवाब मलिक यांचं जेजे रुग्णालयात अर्धा तास मेडिकल होईल. त्यानंतर न्यायालयात सुनावणी होईल, अशी माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपवर पलटवार

‘भाजपमध्ये प्रवेश करुन किंवा भाजपमध्ये राहून आपले घोटाळे लपले जातात, हा ओव्हर कॉन्फिडन्स अनेक भाजपच्या भ्रष्ट नेत्यांना झाला आहे. केंद्रीय यंत्रणा वापरून विरोधकांवर दबाव टाकायचे राजकारण आज सुरु आहे. तरीही जनता मात्र भाजप नेत्यांचा भ्रष्टाचार विसरलेली नाही’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आली आहे.

इतर बातम्या :

‘नवाब बेनकाब हो गया’, आशिष शेलारांचा मलिकांना जोरदार टोला; नितेश राणेंसह अनेक भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर निशाणा

भंगारचा व्यवसाय असलेले मलिक किती कोटींचे ‘नवाब’? जाणून घ्या मलिकांची एकूण संपत्ती

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.