नवाब मलिकांच्या भाजपला दिवाळीच्या खास शुभेच्छा! रविवारी मोठ्या धमाक्याच्या तयारीत?

भाजप नेत्यांवर मलिक आरोपांच्या फैरी झाडत आहेत. बुधवारी सकाळी ट्वीट करत मलिकांनी नाव न घेता भाजप नेत्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात येत्या रविवारी मोठा खुलासा करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

नवाब मलिकांच्या भाजपला दिवाळीच्या खास शुभेच्छा! रविवारी मोठ्या धमाक्याच्या तयारीत?
नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 7:01 PM

मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आरोप आणि खळबळन खुलासा करण्याची मालिका सुरुच ठेवलीय. आधी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि आता भाजप नेत्यांवर मलिक आरोपांच्या फैरी झाडत आहेत. बुधवारी सकाळी ट्वीट करत मलिकांनी नाव न घेता भाजप नेत्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात येत्या रविवारी मोठा खुलासा करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. (Happy Diwali to Nawab Malik’s BJP leaders, Malik hints at big revelation on Sunday)

नवाब मलिकांनी बुधवारी ट्वीट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी एका नव्या खुलाशाचा सूचक इशाराही या ट्वीटमधून दिला आहे. “शुभ दीपावली. तुम्हा सर्वांची दिवाळी मंगलमय होवो. हॉटेल ललितमध्ये अनेक रहस्य लपलेली आहेत. तेव्हा भेटूया रविवारी”, असं ट्वीट मलिक यांनी केलं आहे. मलिकांच्या या ट्वीटनंतर रविवारी कोणता धमका होणार? कोणते फटाके किंवा बॉम्ब फुटणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

दोन दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय. फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा नवाब मलिकांनी केला आहे.

फडणवीसांचा एक व्यक्ती नीरज गुंडे याच शहरात राहातो. ज्याला माजी सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवास, कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी होती. पोलिसांच्या बदल्याही तो ठरवायचा. देवेंद्र फडणवीस जेव्हाही नवी मुंबई, पुण्याकडे जायचे, सायंकाळी ते त्यांच्या घरी हजेरी लावायला जायचे. तिथूनच फडणवीसांचा सर्व मायाजाल चालायचा. सरकार बदलल्यानंतर राज्यात ज्या कुठल्या केंद्रीय संस्था आहेत त्यामध्ये हाच फडणवीसांचा वाझे सर्व कार्यालयात फिरताना दिसत आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

इतर बातम्या :

एसटीच्या सरकारमधील विलिनीकरणाची मागणी मुख्यमंत्री, आघाडीच्या वरिष्ठांकडे मांडणार; दरेकरांच्या भेटीनंतर परबांचं आश्वासन

अनिल देशमुखांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत!, परमबीर सिंहांच्या प्रतिज्ञापत्रानं मोठी खळबळ

Happy Diwali to Nawab Malik’s BJP leaders, Malik hints at big revelation on Sunday

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.