देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांवर तपास यंत्रणांचं काम, वेळ आल्यावर ईडी संदर्भात माहिती बाहेर आणणार : नवाब मलिक

देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. ईडीचे लोक कसे भेटतात, कसे कशी कारवाई करतात, हे सगळे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती ती बाहेर काढून, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांवर तपास यंत्रणांचं काम, वेळ आल्यावर ईडी संदर्भात माहिती बाहेर आणणार : नवाब मलिक
देवेंद्र फडणवीस नवाब मलिक
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 11:16 AM

पणजी: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राज्यात होणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या मुद्यावरुन भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टार्गेट केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून तपास यंत्रणा काम करत आहेत.ईडीचे (ED) लोक कसे भेटतात, कसे कशी कारवाई करतात हे सगळे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर तिथे आम्ही माहिती बाहेर काढू, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. याशिवाय हिजाब आणि गोवा निवडणुकीसंदर्भात देखील नवाब मलिक यांनी भाष्य केलं. तर, नवाब मलिक यांच्या आरोपांना भाजप काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे. नवाब मलिक यांनी काल देखील ईडी कारवायांवरुन देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर हल्लाबोल केला होता.

देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन कारवाई, वेळ आल्यावर माहिती काढणार

देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. ईडीचे लोक कसे भेटतात, कसे कशी कारवाई करतात, हे सगळे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती ती बाहेर काढून, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

हिजाबवरुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

कुठला धर्म स्वीकारायचा किंवा कुठला धर्म पाळायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हिजाब वरती राजकारण करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

गोव्यामध्ये ज्या लोकांना क्रिमिनल सांगितलं जात होतं त्या लोकांना तिकीट भाजपने दिली. आता ती लोक पवित्र झाली का? असा सवाल नवाब मलिक यांनी केला. गोव्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. निकालानंतर येथे त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल आणि त्यानंतर काँग्रेसबरोबर जायचं की नाही त्या संदर्भातला निर्णय होऊ शकेल, असं नवाब मलिक म्हणाले.

इतर बातम्या:

एका रुपयात काय होतं? अहो लग्न होतं की! सोबत गादी, पलंग, फ्रीज, कुलर, कपाटाचा आहेरही

Aurangabad : संत एकनाथ रंगमंदिराचा पडदा आज उघडणार, शिवसेनेच्या वतीने पहिले नाटक फ्री!!

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....