कोरोनाशी लढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घ्या; मोदी एकटे कोरोनाशी लढू शकत नाहीत: नवाब मलिक
कोरोनाचं संकट मोठं आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलवा. (nawab malik taunt central government over corona crisis)
मुंबई: कोरोनाचं संकट मोठं आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलवा. त्यातून मार्ग काढा. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकटे कोरोनाशी लढू शकत नाहीत, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे. (nawab malik taunt central government over corona crisis)
नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा टोला हाणला. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी आता बोलत आहेत. आधी विरोधक जे बोलत होते, तेच आता स्वामी बोलत आहेत. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा देखील तुडवडा आहे, मोदींच काहीच नियोजन नाही. आधी अधिकार घेतले आणि परिस्थिती हाताबाहेर जात असताना केंद्र हात झटकत आहे. सर्वपक्षीय बैठक बोलवून निर्णय घेण्याची गरज आहे, मोदी एकटे कोरोनाशी लढू शकत नाही, असं मलिक म्हणाले.
तर परिस्थिती बिकट होईल
पॉझिटिव्ह रेट आता केवळ गोवा नाही तर यूपीत देखील सारखाच आहे. रॅपिड अँटीजन टेस्ट केल्यावर हा रेट 60 टक्क्यांवर जातोय. जर RTPCR टेस्ट केल्या तर काय होईल? असा सवाल करतानाच टेस्टिंग केल्या तर 10 लाखपर्यत बाधितांची संख्या होईल. लाखो लोकं आपले प्राण गमावतील अशी परिस्थिती आहे. माझी मागणी आहे. सर्व देशातील नेत्यांची बैठक मोदींनी बोलवावी आणि परिस्थिती समजून घ्यावी. विदेशातून सामान येत आहे. परंतु, त्याचे वाटप देखील होत नाही. आज 4000 लोकं मृत्यूमुखी पडत आहेत परिस्थिती आणखी बिकट होईल. केंद्राने मोठ्या प्रमाणत ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची ऑर्डर द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
फेक व्हिडीओ टाकून ममतादिदींची बदनामी
बंगालमधील हिंसेच कोणीच समर्थन करत नाही. सध्या भाजप फेक व्हिडीओ टाकून ममता दिदींची बदनामी करत आहेत. भाजप हरल्या नंतर देशात ममता दिदींविरोधात जे वातावरण निर्माण होत आहे. त्यावरून दुर्लक्ष करण्यासाठी हा प्रकार सुरू आहे, असं ते म्हणाले. किसान सम्मान निधी देऊ अशी घोषणा भाजपने केली होती. आता ममता दिदींनी तत्काळ तो निधी देण्याची मागणी केली आहे. आता केंद्राची जबाबदारी आहे. त्यांनी प्रति शेतकरी 18 हजार रुपये द्यावेत. यासोबतच मोफत लसीकरण देखील करावं. भाजपनेच आश्वास दिलं आहे, त्यांनी आश्वासन पाळलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
टागोरांचे विचारही घ्या
टागोर यांची जयंती सर्वजण साजरी करत आहेत. टागोर जाती धर्माच्या पालिकेड होते. मोदींनी हा लूक बंगाल निवडणुकीसाठी केला होता. आता त्यांनी त्यांचे विचार देखील घेतले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.
थेट जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार
मुंबईत 10 हजारांपेक्षा जास्त क्षमतेचे कोव्हिडं सेंटर उभारली आहेत. अशीच तयारी आम्ही राज्यात करतोय. त्यामुळे आगामी संकटावर आम्ही मात करत आहात. 1500 मॅट्रिक टन ऑक्सिजन आम्ही निर्माण करत आहोत. यासोबतच 300 मॅट्रीक टन ऑक्सिजन निर्माण होईल असे प्लांट काही दिवसांत सुरू होतील. आम्ही कोणतेही अधिकार मंत्र्यांकडे न ठेवता थेट जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे आज मुंबई पॅटर्नची सर्वत्र चर्चा होत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
काकडेंवर तुरुंगात जायची वेळ
यावेळी त्यांनी भाजपचे माजी खासदार संजय काकडेंवरही टीका केली. संजय काकडे म्हणतात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आहे. काकडेंवर आता तुरुंगात जायची वेळ आली आहे. त्यामुळे अशा प्रकारे ते बोलत आहेत. सत्तेचा वापर करून जे धंदे करत होते त्यांनी त्यांचं तोंड बंद ठेवावं. आमचं सरकार आशा लोकांना महत्त्व देत नाही, असंही ते म्हणाले.
ते कॉन्ट्रॅक्ट फडणवीसांनीच दिलं
देशात नवीन संसद बांधण्याबाबत टीका होत होती. आज भाजपचे आमदार म्हणतायत मग मनोरा निवास का बांधत आहेत? देशात कोव्हिडसाठी आर्थिक गरज आहे, असं भाजपकडून सांगण्यात येतंय. मनोरा आमदार निवासाबाबत बोलणाऱ्यांनी हे काँन्ट्रॅक्ट फडणवीस सरकारनेच दिलं होतं हे लक्षात ठेवावं, असा टोलाही त्यांनी लगावला. (nawab malik taunt central government over corona crisis)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 7 May 2021 https://t.co/yBiOabRh7e #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2021
संबंधित बातम्या:
उद्धव ठाकरेंची आघाडीत घुसमट होतेय, आज ना उद्या ते बाहेर पडतील; संजय काकडेंचा बॉम्बगोळा
मराठा आरक्षणाचा निकाल येताच आरोग्य विभागात भरती; वाचा, अशोक चव्हाण काय म्हणाले?
मोदींनी मिटींगमध्येही स्वत:चीच ‘मन की बात’ची टेप लावली, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची टीका
(nawab malik taunt central government over corona crisis)