‘देशात लोकशाहीची हत्या’, गुजरात दंगलीचा उल्लेख करत शरद पवार मोदी सरकारवर तिखट शब्दांत बरसले

"एका बाजूला हे चित्र आणि दुसऱ्या बाजूला सत्तेचा गैरवापर केला जातोय. जेव्हा मी ग्रामीण भागात जातो, ते सांगतात की, दोन वेळा भांडण झालं तर लोक बोलतात तू शांत बस नाहीतर मी ईडी लावतो. आता ईडी हा शब्द आज घराघरात माहित झालाय,", असा टोला शरद पवार यांनी लगावला.

'देशात लोकशाहीची हत्या', गुजरात दंगलीचा उल्लेख करत शरद पवार मोदी सरकारवर तिखट शब्दांत बरसले
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 6:37 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज भाजपवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मुंबईत शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिरात भाषण करताना शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांवरुन सरकारवर निशाणा साधला. “काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये अल्पसंख्यांच्या हत्या झाल्या. त्यांच्यावर हल्ले झाले. काही लोक मृत्यूमुखी पडले. ही जातीय दंगल होती. या जातीय दंगलीच्या पाठीमागे गुजरातमधला सत्ताधारी पक्ष होता. या प्रकरणात ज्यांना अटक झाली त्यामध्ये एक महिला होत्या. खासदार, आमदार, मंत्री आणि अन्य त्यांचे सहकारी होते. इतके दिवस ती केस चालली. या लोकांना अटक झाली. लगेचच त्यांना जामीन दिला गेला”, असं शरद पवार म्हणाले.

“केस अनेक वर्ष चालली आणि आता काल हायकोर्टाचा निकाल आला की, सगळ्या लोकांना निर्दोष म्हणून सोडलं. त्यावेळेला त्या लोकांची हत्या कशी झाली? कुणी हल्ला केलाच नाही तर हत्या होणार कशी? एका दृष्टीने ज्यांची हत्या झाली त्यांचा मृत्यू झाला. तसेच या निकालामुळे देशाचे संविधान आणि कायद्याची देखील हत्या झाली आहे”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

“सत्तेचा वापर वाईट पद्धतीने केला जातोय. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. लोकांच्या समस्या आहेत. महागाईचं संकट आहे. हजारोंच्या संख्येने तरुण नोकरी शोधत आहे. या देशातील अन्नदाता उद्ध्वस्त होतोय. असमानी संकटामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. शेतमाल फेकून द्यावा लागतोय. शेतकरी उद्ध्वस्त झालंय. या शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी कुठल्याही प्रकारची मदत, घोषणा पोहोचलेली नाही बघायला मिळत आहे”, असा दावा संजय राऊत यांनी केला.

हे सुद्धा वाचा

‘सरकारकडून सत्तेचा गैरवापर’

“एका बाजूला हे चित्र आणि दुसऱ्या बाजूला सत्तेचा गैरवापर केला जातोय. जेव्हा मी ग्रामीण भागात जातो, ते सांगतात की, दोन वेळा भांडण झालं तर लोक बोलतात तू शांत बस नाहीतर मी ईडी लावतो. आता ईडी हा शब्द आज घराघरात माहित झालाय. सीबीआयची चौकशी घराघरात माहित झाली. पदाचा वापर करुन विरोधी पक्ष नाउमेद कसा केला जाईल, याची खबरदारी घेतली गेल्याचं बघायला मिळालं”, अशी टीका शरद पवार यांनी केली.

“आपले सहकारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. अनिल देशमुखांनी 100 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला. त्यांना अटक केली गेली. त्यांना तब्बल 13 महिने जेलमध्ये ठेवलं. आता आरोपपत्र दिलं त्यामध्ये सव्वा कोटीचा भ्रष्टाचार झाला असा उल्लेख करण्यात आला. तेही गुजरातच्या शिक्षण संस्थेला कुणी देणगी दिली ती देणगी स्वीकारली हा गुन्हा दाखल केला”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.