जबाबदारी कुणाची, केंद्र की राज्य?, मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांचं पहिल्यांदाच भाष्य

काँग्रेसने केलेल्या स्वबळाच्या घोषणावर शरद पवार म्हणाले, प्रत्येक पक्षाला संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. आमची काहीच तक्रार नाही, कार्यकर्त्यांची उमेद वाढवण्यासाठी आम्ही सर्व बोलत असतो, काँग्रेसचाही तो अधिकार आहे,

जबाबदारी कुणाची, केंद्र की राज्य?, मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांचं पहिल्यांदाच भाष्य
Sharad Pawar and Uddhav Thackeray
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 5:40 PM

पुणे : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द केल्यानंतर, ठाकरे सरकार (Thackeray Sarkar) केंद्राकडे बोट दाखवत आहे. तर भाजप नेते हा राज्याचाच विषय असल्याचं म्हणत ठाकरे सरकारवर बोट ठेवत आहेत. मात्र आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Pune) यांनी पुण्यात बोलताना पहिल्यांदाच याबाबतचं भाष्य केलं आहे. (NCP chief Sharad Pawars first reaction on Maratha reservation, said this is center government responsibility)

शरद पवार म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या खोलात गेलो नाही, राज्य सरकारची चर्चा सुरु आहे, त्यातून मार्ग निघावा. मात्र नव्या पिढीमध्ये ही अस्वस्थता आहे ती दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्राने भूमिका घ्यावी. जी मागणी आहे सुप्रीम कोर्टाने हा अधिकार केंद्र सरकारकडे आहे असं सांगितलं आहे, त्यामुळे केंद्राने भूमिका घ्यायला हवी”.

ओबीसींच्या हिताची जपणूक व्हावी

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला होता, मात्र सुप्रीम कोर्टाने रद्द केला. अधिकार कायम राहावा ही राज्याची भूमिका, त्यातून लवकर काही बाहेर पडावं. हा प्रश्न मराठवाडा, प महाराष्ट्र आणि कोकणातला आहे. विदर्भातील तितका विषय नाही. पण उर्वरित भागाच्या ओबीसी घटकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी हा राज्य सरकारच्या प्रयत्नाचा भाग आहे, त्याचा लवकर निकाल लागावा अशी अपेक्षा, असं शरद पवार म्हणाले.

अनिल देशमुखांवर धाडी, यत्किंचितही चिंता नाही

आमच्यासाठी हे नवं नाही, अनिल देशमुखांच्या कुटुंबीयांवर, त्यांच्या मुलाच्या व्यवसायावर केंद्राने लक्ष ठेवलं होतं, त्यांच्या हाती काही लागलं नाही, त्या नैराश्यातून हा त्रास देण्याचा प्रयत्न आहे. त्याबद्दल यत्किंचितही चिंता नाही, असं शरद पवारांनी सांगितलं.

चंद्रकांत पाटील कर्तृत्वान गृहस्थ

ठराव करुन चौकशीचे मागणी करण्याची (अजित पवार, अनिल परब) ही पहिलीच घटना आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मोठे कर्तृत्वान गृहस्थ आहेत, यापूर्वी कधी झाल्या नाहीत त्या गोष्टी करण्यात त्यांचा लौकीक, त्यांनी पुढाकार घेऊन असं काही केलं तर आश्चर्य नाही. चौकशी यंत्रणा त्यांच्या हातात आहेत, त्यांचं स्वागत आमचे सर्व सहकारी करतील, असं शरद पवार म्हणाले.

विचार दडपण्यासाठी यंत्रणांचा वापर

जो विचार आपल्याला मान्य नाही, तो विचार दडपण्याचा प्रयत्न ईडी सारख्या यंत्रणांकडून होत आहे. हे अनेक राज्यात होत आहे. केंद्रातील सत्ता यांच्या हातात आल्यानंतर हे घडत आहेत. लोक सुद्धा त्यांची गांभीर्याने नोंद घेत नाहीत, असा टोला शरद पवारांनी लगावला.

काँग्रेसला शुभेच्छा

काँग्रेसने केलेल्या स्वबळाच्या घोषणावर शरद पवार म्हणाले, प्रत्येक पक्षाला संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. आमची काहीच तक्रार नाही, कार्यकर्त्यांची उमेद वाढवण्यासाठी आम्ही सर्व बोलत असतो, काँग्रेसचाही तो अधिकार आहे, त्यांना शुभेच्छा.

टाटांना खोल्या देण्याचा प्रश्न मिटला

पर्यायी व्यवस्था झाली, त्याची काही अडचण नाही.. टाटा हॉस्पिटल देशातील एक नंबरचे कॅन्सर रुग्णालय, तिथे कानाकोपऱ्यातून नागरिक येतात. जितेंद्र आव्हाडांना तिथल्या डॉक्टरांनी नातेवाईकांच्या राहण्याबाबत प्रश्ना मांडला होता, स्थानिक आमदारांनी तक्रार केल्याने मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. पण नंतर लगेचच दुसरीकडे जागा दिली, त्यामुळे प्रश्न सुटला, असं शरद पवार म्हणाले.

VIDEO : शरद पवार यांची पत्रकार परिषद

संबंधित बातम्या 

आघाडीचं नेतृत्व करणार का, शरद पवार हसत म्हणाले, फार वर्षे पवारांनी असे उद्योग केलेत!   

अनिल देशमुखांच्या निवासस्थानांवर ईडीची छापेमारी, शरद पवार म्हणतात, आम्हाला यत्किंचितही चिंता नाही!

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.