अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही, घटस्फोटाबाबत कुठून शोध लावला त्यांनाच माहिती: एकनाथ खडसे
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis ) यांनी मुंबईत ट्राफिकमुळं तीन टक्के घटस्फोट होतात असं वक्तव्य केलं होतं.
सुनील थिगळे, टीव्ही 9 मराठी, शिरुर, पुणे: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis ) यांनी मुंबईत ट्राफिकमुळं तीन टक्के घटस्फोट होतात असं वक्तव्य केलं होतं. अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यांवर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रसेचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना त्या वक्तव्याबद्दल विचारलं असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. अमृता फडणवीस यांनी घटस्फोटाबाबत कुठून कसा शोध लावला कोणास ठाऊक, त्यांच्यावर प्रतिक्रिया दिली तर त्यांच्या फार तिखट प्रतिक्रिया येतात त्यामुळे न बोललेच बरं अशा शब्दांत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. एकनाथ खडसे यांनी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे माध्यमांशी बोलताना सावध प्रतिक्रिया दिली.
राज्यपालांकडून अन्याय सुरु
एकनाथ खडसे यांनी राज्यपालांना राज्य सरकारला मार्गदर्शन करताना वेळ का लागतो..? ज्या ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे अशा राज्यात अशा अडचणी का निर्माण होत नाही. निलंबित 12 आमदारांचा प्रश्न भाजपने जसा लावून धरला तसा विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्तीच्या 12 आमदारांचा विषय का लावून धरला नाही. त्या बारा आमदारांच्या यादीत माझं देखील नाव आहे असं मला बाहेरून कळले आहे.एक एक वर्षे निर्णय न देणं हा राज्यपालांकडून होणारा अन्याय असल्याचे खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
महाराष्ट्रात वैयक्तिक कमेंट कोणावरही व्हायला नको, दुसरं राजकारणातल्या महिलांवरती अनेक कमेंट केल्या जातात. परंतु ते त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे, त्यावर कोणीही अजिबात कमेंट करू नये. महाराष्ट्रातल्या राज्य सरकारला कोणतही काम जमतं नसल्याचं आपण पाहतोय, मेट्रोचं काम सुध्दा तसंच पडून आहे. तसेच एसटी कर्मचा-यांचा प्रश्न, मी सामान्य माणूस म्हणून बोलत आहे. जिथं गरजं आहे, तिथं राज्य सरकारने लक्ष द्यावं. भाजपा आणि आरएसएसचे लोक महिलांचा अधिक सन्मान करतात. आज मुंबईतल्या ट्रॅफिकमुळे 3 टक्के डिव्होर्स होतात, त्यामुळं राज्य सरकारने त्याच्या चुकांकडे अधिक लक्ष घालावं असं मी सल्ला देते.
इतर बातम्या:
VIDEO: मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा, सामान्य स्त्री म्हणून ट्विट करते: अमृता फडणवीस
NCP leader Eknath Khadse comment on statement of Amruta Fadnavis over Divorce