गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं; जयंत पाटलांची राणेंवर खोचक टीका
राज्यात शंभर टक्के ऑपरेशन लोटस होणार असल्याचं असं भाकीत वर्तवणारे भाजपचे नेते नारायण राणे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे. (jayant patil criticized narayan rane)
अकोला: राज्यात शंभर टक्के ऑपरेशन लोटस होणार असल्याचं असं भाकीत वर्तवणारे भाजपचे नेते नारायण राणे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे. गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसते, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे. (jayant patil criticized narayan rane)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवाराच्या प्रचारासाठी अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी नारायण राणेंवर सडकून टीका केली. राणे वारंवार राज्य सरकारवर टीका करत असल्याने त्याबाबत पाटील यांना विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं, असं सांगत राणेंची खिल्ली उडवली. भाजप नेहमीच वेगवेगळे स्टेटमेंट देऊन सरकार पडण्याच्या धमक्या देत असते. जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण त्यात त्यांना यश मिळत नाही. संभ्रम निर्माण करणं हा त्यांचा नेहमीचा धंदा आहे, असं सांगतानाच येत्या दोन महिन्यात आपलेच सरकार येणार असं ते हे सरकार आल्यापासून सांगत आहेत. आज आम्ही एक वर्षही पूर्ण केलंय. तरी त्यांचं तेच पालुपद सुरू आहे. त्यामुळे राणेंच्या टीकेला गंभीरपणे घेण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी राज्यात शंभर टक्के ऑपरेशन लोटस होणार असून हे सरकार जाणार असल्याचा दावा केला होता. तसेच ठाकरे सरकार सर्व आघाड्यावर अपयशी झाल्याची टीकाही त्यांनी केली होती. राणेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. हे तिन्ही पक्ष हिंदूविरोधी आहेत असं म्हणणार नाही. पण शिवसेना हिंदुत्ववादी राहिली नाही. शिवसेनेला मी हिंदुत्ववादी म्हणणार नाही. हे तर तडजोडवादी आहेत. गद्दारी करून शिवसेना सत्तेत आली. पदासाठी त्यांनी तडजोड केली, अशी टीकाही त्यांनी केली होती. (jayant patil criticized narayan rane)
बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी टीका
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त केलेल्या ट्विटमधूनही राणे यांनी हिंदुत्वावरून शिवसेनेला घेरले होते. साहेब आपण असता तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती. बाळासाहेब ठाकरेंनी पद आणि पैशासाठी प्रतारणा केली नसती, असा टोला त्यांनी लगावला होता. (jayant patil criticized narayan rane)
VIDEO : महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 27 November 2020https://t.co/C7PKshi05Z
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 27, 2020
संबंधित बातम्या:
भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलतात, चंद्रकांत पाटील बावचळलेत; अजित पवारांचा हल्लाबोल
प्रताप सरनाईकांना अडकवलं जातंय; कारवाई चुकीची हे आता जनतेलाही कळून चुकलंय : जयंत पाटील
भाजपकडून बोललेल्या प्रत्येक मतावर नेहमी प्रतिक्रिया द्यावी असं वाटत नाही : जयंत पाटील
(jayant patil criticized narayan rane)