चंद्रकांत पाटील म्हणाले ‘असे नेते आमच्या खिशात’; आता नवाब मलिक म्हणतात, ‘मी वाट पाहतोय’!
चंद्रकांत पाटील यांना एका पत्रकाराने नवाब मलिक यांच्या समीर वानखेडेंवरील टीकेबाबत विचारलं होतं. त्यावेळी नवाब मलिकांसारखे लोक आम्ही खिशात ठेवतो असं वक्तव्य केलं होतं. पाटील यांच्या या वक्तव्यावर आता मलिकांनी प्रत्युत्तर दिलंय.
मुंबई : ‘भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा खिसा इतका मोठा आहे हे मला माहीत नव्हतं. मी वाट बघतोय ते कधी त्यांच्या खिशात टाकतायत’ असं खुलं आव्हानच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. चंद्रकांत पाटील यांना एका पत्रकाराने नवाब मलिक यांच्या समीर वानखेडेंवरील टीकेबाबत विचारलं होतं. त्यावेळी नवाब मलिकांसारखे लोक आम्ही खिशात ठेवतो असं वक्तव्य केलं होतं. पाटील यांच्या या वक्तव्यावर आता मलिकांनी प्रत्युत्तर दिलंय. (Nawab Malik’s reply to BJP State President Chandrakant Patil’s criticism)
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात की नवाब मलिक सारख्याला मी खिशात ठेवतो. त्यांचा खिसा एवढा मोठा आहे हे मला माहिती नव्हतं. मी वाट पाहतोय की त्यांनी आपल्या मोठ्या खिशात मला टाकावं. मी पाहिल त्यांच्या खिशात काय काय आहे आणि बाहेर येऊन जनतेला सांगेन. त्यांचा एवढा मोठा खिसा असेल तर लवकरात लवकर त्यांनी मला खिशात टाकावं मी वाट पाहतोय, असं प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटलांना दिलंय.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगत आहेत मी नवाब मलिक यांना खिशात ठेवतो. त्यांचा खिसा इतका मोठा आहे हे मला माहीत नाही. मी वाट बघतोय ते कधी त्यांच्या खिशात टाकत आहेत. मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे त्यासाठी चंद्रकांतजी मला तुमच्या खिशात टाका. (1/2) pic.twitter.com/aMZU3VM6sN
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 31, 2021
धनंजय मुंडेंचाही चंद्रकांत पाटलांना टोला
चंद्रकांत पाटील यांना अशी भाषा शोभत नाही. चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत किंवा भाजपच्या कुठल्याच राज्य किंवा केंद्रातील नेत्यांचे खिसे मोठे नाहीत. ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ठेवून बोलायला हवं, अशा शब्दात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटील यांना टोला
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका करताना अशी माणसं आमच्या खिशात असतात, असं म्हटलं होतं. त्यावरुन नवाब मलिक यांनीही प्रत्युत्तर दिलंय. तर सुप्रिया सुळे यांनीही चंद्रकांत पाटील यांना टोला लगावलाय. आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. आमच्या तोंडी अशी भाषा नसते. अशी भाषा आमच्या वाचनातही नसते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
समीर वानखेडे जन्माने मुस्लिमच – मलिक
दरम्यान, नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंबच मुस्लिम आहे. त्यांचे नातेवाईकही मुस्लिमच आहे, असं सांगतानाच बोगस दाखल्यावरूनच वानखेडे यांनी नोकरी मिळवली असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला. समीर वानखेडेंचा मेव्हणा आहे. तो आता व्हेनिसला राहतो. तो त्यांचा नातेवाईक आहे. तो मुस्लिम आहे. काल राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी मीडियाशी संवाद साधताना एक विधान केलं. वानखेडेंनी धर्मांतर केलं नाही असं ते म्हणाले. मी पुन्हा सांगतो वानखेडे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांचे कुटुंब मुस्लिम होते, असं मलिक म्हणाले.
इतर बातम्या :
‘पुण्यात पुढचा महापौर राष्ट्रवादीचा’, अजितदादांच्या नेतृत्वात कामाला लागण्याचे सुप्रिया सुळेंचे आदेश
परमबीर सिंह कुठे गायब झाले? पोलिस आणि सरकारला पडलेल्या प्रश्नांचं संजय निरुपमांनी दिलं उत्तर!
Nawab Malik’s reply to BJP State President Chandrakant Patil’s criticism