बाबरीप्रकरणी शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट, नरसिंह राव यांना काय दिला होता इशारा; भाजपवरील आरोप काय?

विजया राजे यांचा हा सल्ला नरसिंह राव यांनी स्वीकारला. त्यानंतर मी, गृहमंत्री आणि गृहसचिवांनी नरसिंह राव यांना भाजपवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला होता. कारण काहीही होऊ शकतं असं आम्ही सांगितलं होतं.

बाबरीप्रकरणी शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट, नरसिंह राव यांना काय दिला होता इशारा; भाजपवरील आरोप काय?
Sharad PawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 11:17 AM

नवी दिल्ली | 9 ऑगस्ट 2023 : बाबरी मशीद प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपवर विश्वास ठेवू नका. बाबरी मिशिदीला काहीच होणार नाही, असा सल्ला मी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना बाबरी पडण्यापूर्वी दिला होता, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. आम्ही नरसिंह राव यांना सल्ला दिला. पण आमच्याऐवजी नरसिंह राव यांनी भाजपवर विश्वास ठेवला, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार हे बाबरी पडली तेव्हा नरसिंह राव सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते.

ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांच्या ‘हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसाईड’ या पुस्तकांच्या प्रकाशनावेळी शरद पवार यांनी हे विधान केलं. तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि गृह सचिव माधव गोडबोले यांच्यासोबत मी त्या बैठकीला उपस्थित होतो. त्यावेळी विजया राजे सिंधिया यांनी बाबरी मशिदीला काहीच होणार नाही, असं आश्वासन नरसिंह राव यांना दिलं होतं, असा दावा शरद पवार यांनी यावेळी केला.

हे सुद्धा वाचा

सिंधिया काय म्हणाल्या?

काहीही होऊ शकतं असं गृहमंत्री आणि गृह सचिवांना वाटत होतं. पण नरसिंह राव यांनी सिंधिया यांच्यावर विश्वास ठेवला, असं शरद पवार यांनी सांगितलं. यावेळी शरद पवार यांनी त्यावेळीचा घटनाक्रमही सांगितला. मंत्र्यांचा एक गट होता. त्या गटाचा मीही सदस्य होतो. त्या मिटिंगमध्ये विजयाराजे सिंधिया यांनी बाबरीला काही होणार नाही, असं सांगितलं होतं. आम्ही सर्वेतोपरी काळजी घेऊ. पण पंतप्रधानांनी कठोर पावलं उचलू नये, असं सिंधिया म्हणाल्या होत्या, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

भाजपवर विश्वास ठेवला

विजया राजे यांचा हा सल्ला नरसिंह राव यांनी स्वीकारला. त्यानंतर मी, गृहमंत्री आणि गृहसचिवांनी नरसिंह राव यांना भाजपवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला होता. कारण काहीही होऊ शकतं असं आम्ही सांगितलं होतं. पण पंतप्रधानांनी भाजपवर विश्वास ठेवला. त्यानंतर काय झालं हे तुमच्यासमोर आहे, असंही ते म्हणाले.

राजकीय कार्ड गेलं असतं

यावेळी नीरजा चौधरी यांनी बाबरी विद्ध्वंसानंतर नरसिंह राव यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील दिला. आम्ही तसं होऊ दिलं नाही. कारण हा गंभीर घाव संपुष्टात येईल आणि भाजपच्या हातून राजकीय कार्ड निघून जाईल, असं नरसिंह राव यांनी पत्रकारांना सांगितलं होतं, असं नीरजा म्हणाल्या. या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, काँग्रेस नेते शशि थरूर, माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.