शरद पवार यांना धमकी देणारा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत केक कापतोय? अमोल मिटकरी यांच्याकडून ‘तो’ फोटो ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी देणारा सौरभ पिंपळकर हा भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप केला जातोय. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धमकी देणं आमच्या रक्तात नाही, असं प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट फोटो ट्विट करत बावनकुळे यांना प्रश्न विचारला आहे.

शरद पवार यांना धमकी देणारा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत केक कापतोय? अमोल मिटकरी यांच्याकडून 'तो' फोटो ट्विट
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 7:52 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांना सोशल मीडियावर दोन जणांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यामध्ये पहिली धमकी ही ‘राजकारण महाराष्ट्राचे’ या फेसबुक पेजवरुन ‘नर्मदाबाई पटर्धन’ नावाच्या आयडीवरुन देण्यात आली आहे. तर दुसरी धमकी ही ‘सौरभ पिंपळकर’ नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर दिली आहे. या धमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणी धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. धमकी देणाऱ्यांपैकी सौरभ पिंपळकर हा तरुण भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला जातोय. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी एक फोटोच शेअर केलाय.

शरद पवार यांना धमकी देणारी व्यक्ती भाजपची असल्याचा आरोप केला जात होता. पण हा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळला. धमकी देणं हे आमच्या रक्तात नाही, असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित आरोपांवर दिलं होतं. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी शरद पवार यांना धमकी देणाऱ्या सौरभ पिंपळकर सोबतचा चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटोच ट्विट केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये बावनकुळे यांचा उल्लेख करत हे रक्त नेमकं कुणाचं आहे? असा सवाल केला आहे.

अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

“हे आमच्या रक्तात नाही म्हणणारे बावनकुळेजी हे रक्त नेमकं कुणाचं आहे? पवार साहेबांना धमकी देणारा पिंपळकर तुमच्या बाजूला केक कापतोय, ‘राजकारण महाराष्ट्राचे’ ‘नर्मदाबाई पटवर्धन’ सौरभ पिंपळकर हे ट्विटर अकाउंट कुणाच्या रक्ताचे?”, असे प्रश्न अमोेल मिटकरी यांनी उपस्थित केले आहेत. अमोल मिटकरी यांनी केलेल्या या ट्विटवर आता चंद्रशेखर बावनकुळे नेमकी काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मिटकरी यांच्याकडून आणखी दोन फोटो ट्विट

विशेष म्हणजे अमोल मिटकरी यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना फोटो शेअर केलाय. एक व्यक्ती दानवे यांच्याबद्दलचे मत मांडत असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दानवे यांनी आपल्याला सोशल मीडिया संबंधित आयोजित कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं, असं त्या फोटोमध्ये लिहिलेलं बघायला मिळत आहे. या फोटोलाही मिटकरी यांनी हे रक्त कुणाचं? असं कॅप्शन दिलं आहे.

अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेल्या फोटोंना आता भाजपकडून काय प्रत्युत्तर देण्यात येतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे राज्याचे मुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना पूर्ण सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच शरद पवारांना धमकी देणाऱ्या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.