किरीट सोमय्यांचा बेकायदा उत्खननाचा आरोप आमदार सुनील शेळकेनी फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
आजपर्यंत कुठल्याही प्रकारे सामान्य नागरिक आणि शासनाचा एक रुपयाही बुडवला नाही. कुणाची अशी तक्रार असेल तर नक्कीच विचार करेल. मात्र, सर्वसामान्य व्यक्ती किंवा कुठल्याही प्रकारच्या शासकीय अधिकाऱ्यांची तक्रार नसताना राजकीय व्यक्तीने स्वतःच्या हितासाठी आणि माझ्यावर दबाव टाकण्यासाठी जे आरोप केले त्याला मी घाबरणार नाही', असा इशारा सुनील शेळके यांनी दिलाय.
पुणे : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला आहे. सुनील शेळके यांनी 10 कोटी रुपयांचा उत्खनन घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या आरोपांना उत्तर देण्यासाठी सुनील शेळके यांनी आज पत्रकार परिषद घेतली. सोमय्या यांना चुकीची आणि अर्धवट माहिती देत माझ्यावर आरोप करायला लावले, असा आरोप सुनील शेळके यांनी केलाय. (MLA Sunil Shelke’s reply to BJP leader Kirit Somaiya’s scam allegations)
‘किरीट सोमय्या हे माझ्या व्यवसाय ठिकाणी जाणार असल्याची मला कुठलीच कल्पना नव्हती. त्यांना मीच ती माहिती दिली. मात्र, मावळातील जे नेते किरीट सोमय्या यांना घेऊन गेले आणि त्यांना अर्धवट माहिती दिली, त्या आधारे सोमय्या यांनी हे आरोप केले आहेत. मात्र त्यांच्या आरोपाला कुठलाही कागदोपत्री पुरावा नाही. आम्ही जो व्यवसाय करतो तो शासन मान्य आहे. सोमय्या काल ज्या ठिकाणी गेले त्या प्रत्येक ठिकाणी माझाच व्यवसाय आहे, अशी माहिती दिली. मी शासनाचा कुठला महसूल बुडवला असेल तर माझ्याकडे त्यांनी लेखी स्वरूपात द्याव. आजपर्यंत कुठल्याही प्रकारे सामान्य नागरिक आणि शासनाचा एक रुपयाही बुडवला नाही. कुणाची अशी तक्रार असेल तर नक्कीच विचार करेल. मात्र, सर्वसामान्य व्यक्ती किंवा कुठल्याही प्रकारच्या शासकीय अधिकाऱ्यांची तक्रार नसताना राजकीय व्यक्तीने स्वतःच्या हितासाठी आणि माझ्यावर दबाव टाकण्यासाठी जे आरोप केले त्याला मी घाबरणार नाही’, असा इशारा सुनील शेळके यांनी दिलाय.
सुनील शेळकेंचा बाळा भेगडेंना खोचक टोला
‘आरोप झालेल्या गटांपैकी सात गट माझे आहेत. तर उर्वरित गट हे दुसऱ्या व्यक्तीचे आहेत. जे गट माझे किंवा माझ्या कुटुंबियांचे असतील त्या गटावर चौकशी करा. या चौकशीत दोषी आढळलो तर पूर्ण जबाबदारी माझी. सोमय्या यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे योग्य वाटत नाही. ज्याला कर नाही त्याला डर कशाला. जर माझी चौकशी होणार असेल तर खुशाल होऊ द्या. जुने राजकीय ज्येष्ठ सहकारी आहेत त्यांना मला विचारण्याचा अधिकार आहे, अशा शब्दात शेळके यांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना उपरोधिक टोला लगावला आहे.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनात आजी-माजी आमदार भिडले!
मावळ तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनात आजी-माजी आमदार भिडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसीमधील चौथ्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यानी विविध मागण्यांबाबत रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनात आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार बाळा भेगडेही सहभागी झाले होते.
तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक 4 कायमस्वरुपी रद्द करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या सातबारावर टाकलेले 32 (2) चे शिक्के काढण्यासाठी तळेगाव एमआयडीसीमधील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सुनील शेळके यांनी बाळा भेगडे सहभागी झाले होते. त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टिप्पणी केल्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी काही काळ वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. मात्र, शेतकऱ्यांच्या आंदोलनानं आजी-माजी आमदारांमध्येच जुंपल्यामुळे त्याच विषयाची चर्चा अधिक होत आहे.
Devdoot Sanman : जलप्रलयात जीव वाचवणाऱ्यांप्रती कृतज्ञता, टीव्ही 9 ‘देवदूत सन्मान 2021’https://t.co/pdBnXP3OH9 #DevdootSanman | #TV9DevdootSanman | #TV9Marathi
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 14, 2021
इतर बातम्या :
..तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते हे माहिती नव्हतं का?, नाना पटोलेंचा खोचक सवाल
MLA Sunil Shelke’s reply to BJP leader Kirit Somaiya’s scam allegations