सर्वात मोठी बातमी ! अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार

अजितदादा पवार असे काही करू शकतील याची मला कल्पना नव्हती. अजितदादांसोबत मी खूप जवळून काम केले आहे. अजितदादांसाठी माझ्या मनात जी जागा आहे ती कायम राहील. दादांसाठी माझ्या हृदयात जागा आहे, पण दादांच्या निर्णयासोबत मी नाही.

सर्वात मोठी बातमी ! अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 9:32 AM

पुणे : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर आता राष्ट्रवादीत प्रचंड खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत जायचं की अजित पवार यांना पाठिंबा द्यायचा या द्विधा मनस्थितीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अडकले आहेत. काय करावं हेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना समजत नाहीये. त्यातच आता अजित पवार यांनी जिल्हाध्यक्षांना फोन करून सोबत राहण्यास सांगितलं आहे. तर जिल्हाअध्यक्षांनी पाठिंबा कुणाला द्यायचा याचा निर्णय घेण्यासाठी बैठका बोलावल्या आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीत पडझड होण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीचे शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. अमोल कोल्हे यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पक्षात पडलेली फूट आणि झालेली द्विधा मनस्थिती यातून अमोल कोल्हे हे खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अमोल कोल्हे आजच शरद पवार यांच्याकडे त्यांचा राजीनामा सोपविणार आहेत. रविवारपासून राष्ट्रवादीत नाट्यमय घटना घडत आहेत. अजित पवार यांच्या शपथविधी वेळी कोल्हे हे उपस्थित होते. पण त्यांनी आता खादारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

पवारांशी संपर्क

अमोल कोल्हे यांनी काल शरद पवार यांच्याशी संपर्क साधला होता. तसेच मी तुमच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच खासदारकीबाबत निर्णय घेणार असल्याचंही म्हटलं होतं. त्यावर मी उद्या मुंबईत आहे. उद्या या बोलू. तुम्हाला जो योग्य वाटेल तो निर्णय घ्या, असा सल्ला शरद पवार यांनी त्यांना दिला होता. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हे यांचं ट्विट

अमोल कोल्हे यांनी काल एक सूचक ट्विट केलं होतं. जेव्हा हृदय आणि डोक्यात युद्ध सुरू असेल तर हृदयाचं ऐका. डोकं कधी कधी नैतिकता विसरण्याची शक्यता असते. पण हृदय नैतिकतेला कधीच मूठमाती देत नाही, असं म्हणत मी साहेबांसोबतच आहे, असं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं होतं.

काल अजितदादा पवार यांच्याशी एका विषयावर भेट झाली आणि तिथून मी शपथविधी सोहळ्याला गेलो. त्यावेळी मला अजिबात कळले नाही की आजच शपथविधी होणार आहे. लगेच मी तिथे पोहोचलो. अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. सर्वप्रथम माझा प्रश्न होता की ही लोकशाही कोणत्या दिशेने चालली आहे. कोणाशीही वैयक्तिक वैर नाही, पण धोरणाच्या विरोधात उभे राहून बोलणे महत्त्वाचं आहे. शेवटी माझ्याकडे काय झाले याचे उत्तर नव्हते. जेव्हा मी स्वतःला विचारले की मला सामील व्हायचे आहे का? तेव्हा माझी विवेकबुद्धी परवानगी देत नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.