शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल साडे तीन तास बैठक, ‘या’ 5 मुद्द्यांवर खल!
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात सिल्व्हर ओकवर तब्बल साडे तीन तास चर्चा झाली. या भेटीनंतर शरद पवार आणि आमदार रोहित पवार पुण्याकडे रवाना झाले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात सिल्व्हर ओकवर तब्बल साडे तीन तास चर्चा झाली. या भेटीनंतर शरद पवार आणि आमदार रोहित पवार पुण्याकडे रवाना झाले. दरम्यान, या भेटीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, देशातील यूपीएचं नेतृत्व, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसमोर उभं करण्याचं आव्हान आणि यूपीए – 2 बाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. (Sharad Pawar and Prashant Kishor’s meeting end)
शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी प्रशांत किशोर सकाळी पोहोचले. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी पवारांसोबत जेवणही केलं. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडे तीन तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान काही काळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित राहिले. ही भेट संपल्यानंतर शरद पवार आमदार रोहित पवार यांच्यासह पुण्याच्या दिशेनं रवाना झाले. या भेट राजकीय नसल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्यावरुन या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शरद पवार, प्रशांत किशोर भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
2024 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा
देशपातळीवर विरोधी पक्षाचा चेहरा कोण असणार?
बिहार, पश्चिम बंगाल निवडणुकीवर चर्चा,
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्यावरही चर्चा,
पुढील काळात राष्ट्रवादीची रणनिती आणि राजकीय कार्यक्रमाबाबत चर्चा
भेट राजकीय नाही – अजित पवार
अजित पवार यांनी आषाढी वारीबद्दल माहिती देताना पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. प्रशांत किशोर आणि पवारांची भेट राजकीय नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. देशाचे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा वडिलकीच्या नात्याने सल्ला घेण्यासाठी अनेक नेते भेटत असतात. त्यानुसारच प्रशांत किशोर त्यांना भेटत आहेत, असं पवार म्हणाले.
राजकीय रणनीती आखण्याचं काम सोडलं
दरम्यान, पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीती आखण्याचं आणि राजकीय सल्ले देण्याचं काम सोडणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्याचा प्रश्नच येत नाही. त्यासाठी ही भेट नाही, असंही अजित पवार म्हणाले.
‘सिल्व्हर ओक’वर लंच डिप्लोमसी
दरम्यान, प्रशांत किशोर हे सिल्वहर ओक येथे पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दोघेही बंद दाराआड चर्चा करणार आहेत. त्यानंतर दोघेही एकत्र जेवण घेणार आहेत. प्रशांत किशोर आणि शरद पवार भेटणार म्हणजे कुठल्या तरी निवडणुकांचीच तयारी असणार हे निश्चित असल्याचं बोललं जात आहे. प्रशांत किशोर हे आधी मोदींसोबत काम करत होते. नंतर त्यांनी पंजाब, बिहारमध्येही स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम पाहिलं. ममता बॅनर्जींचा विजयही त्यांनी सोपा केला. त्याच पार्श्वभूमीवर ते आता शरद पवारांना भेटत आहेत. त्यामुळे या भेटीची मोठी उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या :
शरद पवार-प्रशांत किशोर भेट राजकीय नाही; लोकसभेच्या रणनीतीचाही प्रश्नच नाही: अजित पवार
पवार-प्रशांत किशोर भेटीत ‘मविआ’ आणि ‘बंगाल मॉडेल’वर चर्चा?; जयंत पाटील ‘सिल्व्हर ओक’वर तातडीने दाखल
Sharad Pawar and Prashant Kishor’s meeting end