शरद पवारांची कोरोनावर मात; डॉक्टर, मित्र, हितचिंतकांचे मानले आभार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष (NCP president) शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली होती. मात्र पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. अवघ्या सात दिवसांमध्ये शरद पवार यांनी कोरोनावर मात केली आहे.

शरद पवारांची कोरोनावर मात; डॉक्टर, मित्र, हितचिंतकांचे मानले आभार
शरद पवार
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 6:40 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष (NCP president) शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली होती. मात्र पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. अवघ्या सात दिवसांमध्ये शरद पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. शरद पवार यांनीच आपण कोरोनामुक्त झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. आज माझी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. माझी तब्येत देखील चांगली आहे. मला कोरोना झाल्यानंतर मी लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केली, ते माझे सर्व सहकारी, मित्र, हितचिंतक आणि डॉक्टरांचे मी आभार मानतो असे शरद पवार यांनी म्हटले आहे. सात दिवसांपूर्वी शरद पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच स्वपक्षासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सुद्धा पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

24 जानेवारीला झाली होती कोरोनाची लागण

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना 24 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यावेळी देखील शरद पवार यांनी ट्वीट करत कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले होते. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती देखील त्यांनी केली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच पवारांनी उपचार घेतले होते. अखेर उपचाराअंती पवारांनी कोरोनावर मात केली आहे. खुद्द पवार यांनी ट्वीट करून कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली असल्याची माहिती दिली.

काय म्हणाले पवार?

आज माझी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. माझी तब्येत देखील चांगली आहे. मला कोरोना झाल्यानंतर मी लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केली, ते माझे सर्व सहकारी, मित्र, हितचिंतक आणि डॉक्टरांचे मी आभार मानतो असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांचे ट्विट

संबंधित बातम्या

Nitesh Rane | दिलासा की उसासा, हे ठरण्याआधी सिंधुदुर्ग कोर्टात नेमकं 2 वकिलांमध्ये काय युक्तिवाद झाला?

Wine In Maharashtra : मंदिरात पाण्याऐवजी वाईन द्या, डेअरी बंद करा वायनरी काढा-सदाभाऊ खोत

Students Agitation : जे भल्या भल्या नेत्यांना, अभिनेत्यांना जमत नाही ते हिंदुस्थानी भाऊने कसे करुन दाखवलं? कसे जमा केले विद्यार्थी?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.