नवी मुंबईत पोस्ट ऑफिसबाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची घोषणाबाजी, व्यंकय्या नायडूंना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणेचे 20 लाख पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यंकय्या नायडू यांना 'जय भवानी, जय शिवाजी' लिहिलेलं 20 लाख पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे (NCP send 20 lakh letter to vice president venkaiah naidu).

नवी मुंबईत पोस्ट ऑफिसबाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची घोषणाबाजी, व्यंकय्या नायडूंना 'जय भवानी, जय शिवाजी' घोषणेचे 20 लाख पत्र
Follow us
| Updated on: Jul 24, 2020 | 5:50 PM

नवी मुंबई : राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी‘, अशी घोषणा केल्याने राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या गोष्टीचा निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी, जय शिवाजी’ लिहिलेलं 20 लाख पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे (NCP send 20 lakh letter to vice president venkaiah naidu).

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गुरुवारपासून (23 जुलै) व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठवले जात आहेत. विशेष म्हणजे आज (24 जुलै) नवी मुंबईतदेखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी वाशी आणि खारघर पोस्ट ऑफिसबाहेर ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी करत व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठवले (NCP send 20 lakh letter to vice president venkaiah naidu).

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी शहबाझ पटेल, प्रशांत पाटील, तेजस शिंदे, गौतम आगा, राजेश भोर, योगेश काळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात 22 जुलै रोजी खासदारकीची शपथ घेतली. भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिल्याने राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज दिली. मात्र, या घटनेमुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ‘जय भवानी, जय शिवाजी’लिहिलेलं पत्र व्यंकय्या नायडू यांना पाठवले जात आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी उदयनराजे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

उदयनराजे यांचे स्पष्टीकरण

महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, पण तसं काही झालंच नाही व्यंकय्या नायडू यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही” अशा शब्दात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथविधीनंतर काही घडलेच नसल्याचा दावा केला आहे.

सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला तो, फक्त जे राज्यघटनेत नाही त्याला घेतला, माझी हात जोडून राजकारण करणाऱ्यांना विनंती, आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झालं, महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

“माझा स्वभाव पाहता मी ऐकून घेईन असं वाटतं का तुम्हाला? या सभागृहाचा चेअरमन मी आहे, असं फक्त ते (नायडू) म्हणाले. आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला, व्यंकय्या नायडूंनी उलट त्यांना थांबवलं, पवारसाहेब तिथेच बसले होते, आपण त्यांना विचारा, जे घडलं नाही, ते भासवण्याचा प्रयत्न करू नका, ही हात जोडून कळकळीची विनंती” असे उदयनराजे म्हणाले.

व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचं केलं नाही, त्यांनी काही चुकीचं केलं असतं, तर मीच माफीची मागणी केली असती. असंही उदयनराजे म्हणाले.

संबंधित बातम्या :

इंग्रजीतून शपथ घेऊन उदयनराजे म्हणाले, जय भवानी, जय शिवाजी, सभापतींकडून समज

व्यंकय्या नायडूंविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी आक्रमक, ब्राह्मण महासंघाकडून माफीची मागणी

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.