‘त्यांच्याकडे केंद्राची सत्ता असेल तर आमच्याकडे महाविकास आघाडी सरकार’, मलिकांचा भाजपला इशारा

आम्ही बोलू तोच कायदा, आम्ही बोलू तेच होणार इतकी लोकशाहीची थट्टा होऊ शकत नाही, अशा शब्दात नवाब मलिक केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केलीय. मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना मलिक यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

'त्यांच्याकडे केंद्राची सत्ता असेल तर आमच्याकडे महाविकास आघाडी सरकार', मलिकांचा भाजपला इशारा
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 5:59 PM

मुंबई : भाजप ठरवणार, भाजप मागणी करणार, भाजपची लोकं निर्णय घेणार, भाजपची लोकं लोकांना अटक करणार, लोकांना दंड ठोठावणार, ही लोकशाही आहे का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. आम्ही बोलू तोच कायदा, आम्ही बोलू तेच होणार इतकी लोकशाहीची थट्टा होऊ शकत नाही, अशा शब्दात नवाब मलिक केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केलीय. मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना मलिक यांनी भाजपवर निशाणा साधलाय. (NCP spokesperson Nawab Malik warns BJP leaders)

भयाचं वातावरण निर्माण करायचं, लोकांवर राजकीय दबाव आणायचा, असा प्रयत्न भाजप देशभरात करत आहे. परंतु त्यांचं बंगाल मॉडेल फेल ठरलं आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. महाराष्ट्रातही बंगाल मॉडेल राबवायची भाजपची इच्छा असेल तर जरुर राबवावं. भाजपच्या डावपेचाला महाविकास आघाडीतील एकही पक्ष घाबरत नाही, असा इशाराही मलिक यांनी भाजप नेत्यांना दिलाय.

विधानसभा अध्यक्ष निवडणूक

आमदारांचे कोरोना रिपोर्ट आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अंतिम निर्णय होईल. मात्र, आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मताने जिंकू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केलाय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत सुचवलं आहे. निश्चितरुपाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणं आवश्यक आहे. त्याबाबत तिन्ही पक्षात एकमत आहे. दोन दिवसाचं अधिवेशन असलं तरी याच अधिवेशनात कार्यक्रम करता येईल यावर विचारविनिमय सुरु असल्याचंही नवाब मलिक यांनी सांगितलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना टोला

दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना अध्यक्षपदाची निवडणूक लवकर करा असं सूचित केलं आहे. मात्र विधानपरिषदेच्या 12 जागा रिक्त आहेत. तो विषयही प्रलंबित आहे. तो निकाली काढलात तर 12 आमदार महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी कामाला लागतील, असं सांगतानाच असा आमचा आग्रह वारंवार राहिला आहे. याची आठवणही मलिक यांनी राज्यपाल यांना आज पुन्हा एकदा करुन दिली. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊच. पण त्याअगोदर 12 आमदार नियुक्तीचे प्रकरण लवकर निकाली काढा, असा विनंतीवजा आग्रह मलिक यांनी राज्यपालांना केलाय.

संबंधित बातम्या :

‘मी मंत्रीपदाची मागणी केलेली नाही, जी जबाबदारी देतील ते पार पाडेन’, नाना पटोलेंकडून स्पष्ट

विधानसभा अध्यक्ष निवडणूक : काँग्रेसने आता नावही फोडलं? अध्यक्षपदासाठी पुण्यातील आमदार आघाडीवर

NCP spokesperson Nawab Malik warns BJP leaders 

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.