राज्यातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणाऱ्या भाजपचं आंदोलन म्हणजे सौ चुहे खाके… जयंत पाटलांची फडणवीसांवर नाव न घेता टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपच्या ओबीसी आरक्षणासाठीच्या (BJP OBC Reservation Protest) चक्काजाम आंदोलनावर टीका केली आहे.

राज्यातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणाऱ्या भाजपचं आंदोलन म्हणजे सौ चुहे खाके... जयंत पाटलांची फडणवीसांवर नाव न घेता टीका
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 12:26 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपच्या ओबीसी आरक्षणासाठीच्या (BJP OBC Reservation Protest) चक्काजाम आंदोलनावर टीका केली आहे. राज्य भरातील ओबीसी नेतृत्त्व ठरवून मोडीत काढणारा भाजप आज ओबीसी आरक्षणसाठी आंदोलन करत आहे. सौ चुहे खाके बिल्ली हज को चली, अशा शब्दात जयंत पाटील यांनी महाराष्ट्र भाजपवर टीका केली आहे. (NCP State President Jayant Patil slams BJP over OBC Reservation Protest for political reservation)

जंयत पाटील यांचं ट्विट

जयंत पाटील यांचा रोख कुणाकडे?

जयंत पाटील यांनी महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांवर टीका करताना “राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. सौ चुहे खाके बिल्ली हज को चली”, असा टोला लगावला आहे. जयंत पाटील यांनी यानिमित्तानं विधानसभा निवडणुकीत भाजपनं ओबीसी नेत्यांना नाकरण्यात आलेल्या तिकिटांच्या प्रकरणाकडे लक्ष वेधलं आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाजपनं तिकीट कापलं होतं, त्याकडे लक्ष वेधलं आहे. जयंत पाटील यांच्या या ट्विटचा रोख माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं दिसतं.

रोहिणी खडसे यांचांही भाजपवर निशाणा

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते आंदोलन करताना मा. खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना, असा सवाल रोहिणी खडसे यांनी भाजपला विचारला आहे. रोहिणी खडसे यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे.

रोहिणी खडसे यांचं ट्विट

आजचे भाजपाचे ओबीसी आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलन हास्यास्पद आहे. फक्त राजकारण करण्यासाठी हे आंदोलन आहे. आरक्षण ओबीसी समाजाला मिळायलाच हवं यात कोणाचेही दुमत नाही, फक्त यात राजकारण करू नका, असंही रोहिणी खडसे म्हणाल्या.

संबंधित बातम्या:

आता सत्तेवर आलात, भविष्यात जनता दारात उभं करणार नाही, OBC आरक्षणावरुन पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर घणाघात

तर ओबीसींचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी करावं, छगन भुजबळ यांची खुली ऑफर

(NCP State President Jayant Patil slams BJP over OBC Reservation Protest for political reservation)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.