AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझी नको ती बदनामी केली’, राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांचा आक्रमक पवित्रा, चित्रा वाघ यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार

'भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी बीडच्या शिरुरमध्ये येऊन माझी नको ती बदनामी केली', असा आरोप करत राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

'माझी नको ती बदनामी केली', राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांचा आक्रमक पवित्रा, चित्रा वाघ यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार
चित्रा वाघ आणि मेहबूब शेख
| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 11:58 AM
Share

मुंबई : ‘भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी बीडच्या शिरुरमध्ये येऊन माझी नको ती बदनामी केली’, असा आरोप करत राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मेहबूब शेख यांनी बीडच्या शिरुर कासार पोलिस ठाण्यात चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

“भाजपच्या नेत्या चित्रा वाघ 18 तारखेला शिरुरमध्ये आल्या होत्या. त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते होते. यावेळी माझी बदनामी व्हावी या हेतूने त्यांनी मला बलात्कारी म्हटलं तसंच माझ्यावर खोटे आरोप लावून माझी बदनामी केली”, असा आरोप मेहबूब शेख यांनी केला आहे.

मेहबूब शेख यांनी पोलिस तक्रारीत काय म्हटलंय?

“18 जुलै 2021 रोजी शिवाजी एकनाथ पवार (जिल्हा परिषद सदस्य बीड) यांच्या घरी चित्रा वाघ आल्या होत्या. त्यांच्यासोबत बीड जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के आणि इतर असंख्य कार्यकर्ते हजर होते. चित्रा वाघ यांनी शिरुर येथे येऊन माझी बदनामी व्हावी या उद्देशाने मी एका मुलीवर बलात्कार केला असल्याचं सांगत, राज्य सरकार मेहबूबला अटक करत नाही, असं म्हटलं.”

“वास्तविक माझ्यावर झालेल्या आरोपांसंबंधी पोलिसांनी तपास करुन तो गुन्हा निकाली काढला आहे. मात्र तरीही माझी बदनामी व्हावी, या उद्देशाने त्यांनी माझ्यावर नको नको ते आरोप केले आणि माझ्या बदनामीचा प्रयत्न केला”, असं मेहबूब शेख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय.

“चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपाची व्हिडीओ क्लिप काही पत्रकार मित्रांनी मला दाखवली, जी पाहिल्यानंतर मला खूप मनस्ताप झाला. माझी समाजात बदनामी झाली”, असंही मेहबूब शेख यांनी म्हटलंय.

या प्रकरणाला नेमकी पार्श्वभूमी कोणती?

औरंगाबादमधील एका तरुणीने राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात मेहबूब शेख चांगलेच अडचणीत आले होते. त्यावेळी त्यांची पोलिस चौकशीही झाली. या सगळ्या प्रकरणांवरुन चित्रा वाघ यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. मेहबूब शेख यांना अटक व्हावी, अशी मागणी करणारे ट्विट त्यांनी मागील काळात केले.

मेहबूब शेख हे बीड जिल्ह्यातील शिरुरचे रहिवासी आहेत. साहजिक शिरुरला गेल्यानंतर चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्यावरती टीका करताना त्यांना बलात्कारी म्हटल्याचं मेहबूब शेख यांचं म्हणणं आहे.  मेहबूब शेख यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता चित्रा वाघ यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.

(NCP youth President Maheboob Shaikh complaint against Chitra Wagh in beed shirur Police)

संबंधित बातम्या :

Rape Case | “नोकरीचं आमिष दाखवून अत्याचार, आता ‘तो मी नव्हेचं’”, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.