Neelam Gorhe : राज्यात महिला मुलींच्या अत्याचारात वाढ, पोलिसांनी कडक कारवाई करण्याची नीलम गोऱ्हे यांची मागणी

सदर मुलीला राज्य शासनाच्या मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून आधार देण्यासाठी कार्यवाही करावी, पीडितेला समुपदेशन करण्यासाठी आवश्यक त्या संस्थांची मदत घ्यावी आणि अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी पोलिसांनी अधिक कठोर भूमिका घ्यावी अशा सूचनाही यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

Neelam Gorhe : राज्यात महिला मुलींच्या अत्याचारात वाढ, पोलिसांनी कडक कारवाई करण्याची नीलम गोऱ्हे यांची मागणी
Neelam Gorhe : राज्यात महिला मुलींच्या अत्याचारात वाढ, पोलिसांनी कडक कारवाई करण्याची नीलम गोऱ्हे यांची मागणी Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 12:02 AM

पुणे : राज्याच्या (Maharashtra) विविध भागात महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात देखील अशा घटना होत आहेत. ठाण्यासारख्या (Thane) सुसंस्कृत भागातही अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची चिंताजनक घटना घडली आहे. यामुळे महिलांची सामाजिक सुरक्षा धोक्यात येऊ पाहत आहे. समाजहिताच्या दृष्टीने ही बाब निश्चितच भूषणावह नाही. अशा प्रकारच्या घटनांमध्ये आरोपींना अधिकाधिक शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी कार्यवाही केली पाहिजे, असे मत आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी येथे व्यक्त केले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज ठाणे शहर पोलिस आयुक्त श्री. जयजीत सिंग यांना दूरध्वनी वरून सूचना दिल्या आहेत. मुंबई-ठाण्यासारख्या अति वर्दळीच्या भागात या अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. अशा घटना घडविण्यामागे एखादी टोळी कार्यरत आहे किंवा काय याबाबत अधिक तपास करण्यात यावा. या पार्श्वभूमीवर या घटनेच्या आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली असली तरीही त्यांच्यावर त्वरित चार्जशीट दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत. या तीनही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती कलमे लावण्याचे आणि न्यायालयात हा खटला जलद गतीने सुरू होण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले आहेत. याकरिता राज्य शासनाच्या विधी सेवा प्राधिकरणाची मदत घ्यावी. याचबरोबर मागील दोन महिन्यांच्या काळात शहरात एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले, विवाहित अथवा अविवाहित महिलांना फसवून अपहरण, रस्त्यात होणारी मुलींची छेडछाड, वारंवार होत असलेल्या अत्याचाराच्या घटना याबाबत आढावा घ्यावा. या आरोपींना जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न व्हावेत. जे चार्जशीट कोर्टात दाखल आहेत त्यांचा निकाल लवकरात लवकर लागण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया करावी. अशा घटनांमध्ये जे आरोपी जामिनावर सुटलेले आहेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करायला हवी, अशा प्रकारच्या उपाययोजना करण्याचे निर्देश आज डॉ. गोऱ्हे यांनी पोलिसांना एका निवेदनाद्वारे दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

सदर मुलीला राज्य शासनाच्या मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून आधार देण्यासाठी कार्यवाही करावी, पीडितेला समुपदेशन करण्यासाठी आवश्यक त्या संस्थांची मदत घ्यावी आणि अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी पोलिसांनी अधिक कठोर भूमिका घ्यावी अशा सूचनाही यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.