नारायण राणे यांचं ‘ते’ विधान लागलं; नीलम गोऱ्हे म्हणाल्या; हे तर चिंटूचे जोक्स

नीलम गोऱ्हे यांनी या चर्चांचं खंडन केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली तेव्हा तिथे ओमप्रकाश बिर्लाही होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही होते.

नारायण राणे यांचं 'ते' विधान लागलं; नीलम गोऱ्हे म्हणाल्या; हे तर चिंटूचे जोक्स
नारायण राणे यांचं 'ते' विधान लागलं; नीलम गोऱ्हे म्हणाल्या; हे तर चिंटूचे जोक्सImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 11:18 AM

पुणे: नीलम गोऱ्हे शिवसेनेत नाराज होत्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे त्या शिवसेना सोडून चालल्या होत्या. माझ्या शिफारशीमुळे त्या थांबल्या, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. राणे यांच्या या दाव्याचं नीलम गोऱ्हे यांनी खंडन केलं आहे. राणेंच्या म्हणण्यात काहीही तथ्य नसल्याचं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे यांचं विधान हस्यास्पद आहे. ते चिंटूचे जोक्स आहेत. माझं त्यांच्याशी कधी बोलणंही झालं नाही. तसेच 2004 नंतर मी त्यांना कधी भेटलेही नाही, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. तसेच मी शिंदे गटात जाणार नाही. मला तशी गरजच वाटत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

नीलम गोऱ्हे ट्रायडंट हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटल्या. या दोन्ही नेत्यांबरोबर नीलम गोऱ्हे यांची तासभर बंद दाराआड चर्चा झाल्याचं वृत्त आहे. काय चर्चा झाली ते कळू शकलं नाही. पण बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

नीलम गोऱ्हे यांनी या चर्चांचं खंडन केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली तेव्हा तिथे ओमप्रकाश बिर्लाही होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही होते. अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याच्या बातम्या आहेत. असे काही नाही. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी योग्य ती कारवाई व्हावी. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीचं निवेदन नीलम गोऱ्हे यांनी ओम बिर्ला यांना दिलं.

श्रद्धा ही महाराष्ट्रातील वसईची राहणारी होती. तिची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्यावर याबाबत कार्यवाही करीत असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.