AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे महापालिकेवर झेंडा फडकवणार, वर्धापन दिनी राष्ट्रवादीचा निर्धार

आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे.

पुणे महापालिकेवर झेंडा फडकवणार, वर्धापन दिनी राष्ट्रवादीचा निर्धार
पुणे महापालिका
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 11:56 AM
Share

पुणे : येत्या महापालिका निवडणुकीत पुण्यात (Pune municipal election) राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा (NCP) फडकवणार, असा निर्धार राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी केला. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात जगताप बोलत होते. (Next mayor in Pune Municipal Corporation will be from NCP claim Prashant Jagtap on NCP foundation day Vardhapan Din )

सत्ताधारी भाजपच्या कामावरती पुणेकरांमध्ये असंतोष आहे. पुणेकर आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवतील. अजित पवारांच्या नेतृत्वात महापालिका जिंकू असा विश्वास शहराध्यक्ष जगताप यांनी व्यक्त केला.

पुणे महापालिकेत एकूण 164 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. त्यापैकी भाजपकडे सर्वाधिक 99 नगरसेवक आहेत.  तर राष्ट्रवादी 44, काँग्रेस 9 आणि शिवसेनेकडे 9 जागांचं बळ आहे.

राष्ट्रवादी शिवसेना एकत्र लढणार?

शिवेसना नेते संजय राऊत (Sanjay Raut on PMC Election) यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये पुणे दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी पुणे महापालिका निवडणुकीबाबत मोठ वक्तव्य केलं होतं. राऊत यांनी पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढतील, अशी घोषणा केली .

पुणे महापालिकेत सध्या भाजप सत्तेत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढणार आहे. तर, काँग्रेसला सोबत घेण्याचा विचार असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

पुणे महापालिका पक्षीय बलाबल

  • भाजप 99
  • काँग्रेस 09
  • राष्ट्रवादी 44
  • मनसे 2
  • सेना 9
  • एमआयएम 1
  • एकूण 164

संबंधित बातम्या  

पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना राष्ट्रवादीचं ठरलं, संजय राऊतांकडून मोठी घोषणा

EXCLUSIVE : मुख्यमंत्रिपदाबाबत घरात बसून वक्तव्य योग्य नाही, जयंत पाटील यांची रोखठोक मुलाखत

(Next mayor in Pune Municipal Corporation will be from NCP claim Prashant Jagtap on NCP foundation day )

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.